लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत प्रचाराचा जोर चांगलाच वाढला आहे. अशात आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडताना दिसत आहेत. इतकंच नाही तर एकमेकांविरोधात तक्रारीही करण्याचं सत्र सुरु आहे. काँग्रेसने ‘नमो’ या लोगोविरोधात आणि नरेंद्र मोदींची भाषणं दूरदर्शनावर सातत्याने दाखवण्याविरोधात आक्षेप नोंदवला आहे. एवढंच नाही तर या संबंधीच्या तक्रारींसाठी निवडणूक आयोगात धावही घेतली आहे. माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचं एक प्रतिनिधी मंडळ निवडणूक आयोगाकडे गेलं होतं.

आजच फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटने काँग्रेसशी संबंधित ६८७ पेजेस आणि अकाऊंट डिलिट केले. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. अशात आता काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे दूरदर्शनवर दाखवली जाण्याबाबत आणि नमो या चिन्हाबाबत आक्षेप नोंदवला आहे. आता या आक्षेपावर निवडणूक आयोग काही निर्णय घेणार का? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काही निवडक भाषणे दूरदर्शनवर प्रसारित केली जातात. तसेच नमो या लोगोची जाहिरातही सातत्याने होत असते हे त्वरित थांबवावे अन्यथा टीव्ही पाहणाऱ्या प्रेक्षकांची दिशाभूल होऊ शकते असे काँग्रेसने म्हटले आहे. आता यावर निवडणूक आयोग कारवाई करणार की गप्प बसणार हे पहाणे महत्त्वाचे आहे,