News Flash

शहीद करकरेंचा अपमान केल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंहना नोटीस

२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञा सिंह यांनी वादग्रस्त विधान केले होते.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर

२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. साध्वी प्रज्ञा भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार आहेत.


याप्रकरणी बोलताना जिल्हा निवडणूक अधिकारी आणि भोपाळचे जिल्हाधिकारी सुदाम खाडे म्हणाले, आम्ही या विधानाची स्वतः खात्री करुन घेतली आहे. तसेच या प्रकरणी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजक आणि साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याविरोधात आम्ही कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. यावर २४ तासांत त्यांना उत्तर द्यायचे आहे. सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांचा हा अहवाल आम्ही निवडणूक आयोगाकडेही पाठवणार आहोत.

खाडे म्हणाले, आचारसंहिता लागू असताना या कार्यक्रमाच्या आयोजकांनी काही अटींवर कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यात आली होती. गुरुवारी संध्याकाळी भोपाळ उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत मुंबई एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांच्यावर आरोप करताना त्यांनी तुरुंगात आपल्याला त्रास दिल्याचा गंभीर आरोप स्वाध्वी प्रज्ञा सिंह यांनी केला होता. करकरेंचा सर्वनाश होवो असा शाप मी दिला होता. त्यानंतर सव्वा महिन्यानंतर करकरेंना दहशतवाद्यांनी ठार केले, असे विधान त्यांनी केले होते. या विधानानंतर चौफेर टीका झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आपले विधान मागे घेतले होते तसेच माफीही मागितली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 5:03 pm

Web Title: a notice has been issued to pragya singh thakur by district election officer
Next Stories
1 ५० एकर जमीन आणि घरदार विकून निवडणूक लढवणारा जालन्यातील अवलिया
2 माढ्यातील काही मुलं खूपच गद्दार निघाली – धनंजय मुंडे
3 लाव रे व्हिडिओ: लोकशाहीचा नकली टेंभा मिरवणारे पक्षाध्यक्ष; भाजपाचा राज ठाकरेंवर निशाणा
Just Now!
X