लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सपशेल नाकारल्यानंतरही दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांचा आपल्यालाच पाठिंबा असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला असून पक्षाचे एकमेव खासदार भगवंत मान हेच केवळ आपली जागा राखू शकले. तर दिल्लातील सातही जागांवर पक्षाच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. अरविंद केजरीवाल यांनी मात्र दिल्लीत आपल्या पक्षाविरोधात आपल्याविरोधात कोणतीही नकारात्मकता नसल्याचं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘दिल्लीत आम आदमी पक्षाविरोधात कोणतीही नकारात्मकता नाही. अनेक लोकांनी मला सांगितलं की, ही मोठी निवडणूक आहे, राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींमधील निवडणूक आहे. केजरीवालांची निवडणूक नाही. तुमची निवडणूक येऊ देत, आम्ही तुमच्या कामाच्या आधारे तुम्हाला मतदान करु’, असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.

अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर रविवारी पक्ष कार्यकर्त्यांची चिंतन बैठक बोलावली होती. पंजाबी बाग क्लब येथे होत असलेल्या या बैठकीत लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या सपशेल अपयशाच्या कारणांची मिमांसा केली गेली. तसेच, दिल्लीच्या आगामी विधानसभा निवडणूकांसाठी योजना आखण्यात आली.

या लोकसभा निवडणूकीत आम आदमी पार्टीचे प्रदर्शन अतिशय वाईट झाले. पार्टीचे एकमेव खासदार भगवंत मान हेच केवळ आपली जागा राखू शकले. तर दिल्लातील सातही जागांवर पार्टीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. हा पक्षासाठी एकप्रकारे मोठा झटकाच होता. दिल्लीत ‘आप’ला मिळालेली मत केवळ १८ टक्के होती. तर भाजपाला ५६ टक्के व काँग्रेसला २३ टक्के मत मिळाली. तर ‘आप’च्या दिलीप पांडे, पंकज गुप्ता व ब्रजेश गोयल या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

पंजाब व दिल्ली व्यतिरिक्त पार्टीने हरियाणामध्ये देखील उमेदवार उभे केले होते. मात्र, तिथेही कोणताही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. आता पक्षाने आपले संपूर्ण लक्ष आगामी विधासभा निवडणुकांवर केंद्रीत केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap arvind kejariwal delhi lok sabha election result
First published on: 27-05-2019 at 11:35 IST