आजपर्यंत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकीय मुद्द्यांवर अनेक भाषणं आणि मुलाखती देताना पाहिलं आहे. पण पहिल्यांदाच मोदींच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न अभिनेता अक्षय कुमारने केला आहे. अक्षयने मोदींची मुलाखत घेतली असून यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच छोट्या-मोठ्या गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत. या मुलाखतीच्या माध्यमातून मोदींच्या खासगी आयुष्यातील बरीचशी माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे. पंतप्रधान मोदींना राग येतो का, सोशल मीडियावरील मीम्सवर त्यांची प्रतिक्रिया काय असते, विरोधी पक्षांसोबत त्यांचं नातं कसं असतं अशा विविध प्रश्नांवर त्यांनी मनमोकळेपणाने या मुलाखतीत उत्तरं दिली आहेत.

सोशल मीडियावरील मीम्सवरील प्रश्नाला उत्तर देताना अक्षय कुमारने आता या मुलाखतीवरही मिम्स तयार होतील अशी शक्यता मोदींना बोलून दाखवली होती. नेटकऱ्यांनीही अक्षयचा शब्द पडू न देता या मुलाखतीवरुन मिम्स व्हायरल केले आहेत. अगदी ओव्हर अॅक्टींगसाठी पैसे कापण्यापासून ते माझी मुलाखत कधी घेणार असा प्रश्न विचारणाऱ्या राहुल गांधीपर्यंतचे मिम्स सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत. पाहुयात असेच व्हायरल झालेले मिम्स…

रक्तातली साखर वाढली

ओव्हर अॅक्टींगचे पैसे कापा

कसं करता मोदीजी

भाईसाहाब ये किस लाइन मे…

चौकीदार बनणार…

माझ्या मुलाखतीचं काय

जनता ऐवढी वेडी नाहीय

दलालवूड

ते स्वत:च्या आईला भेटायला जाताना…

बापरे एवढे कठीण प्रश्न की…

दरम्यान या मुलाखतीमध्ये मिम्समधील क्रिएटीव्हीटी आपण एन्जॉय करतो. त्यामध्ये मी मोदी पाहत नाही तर ते मिम्स तयार करणाऱ्यांची कल्पनाशक्ती कशी चालते हे पाहून मीही या मिम्सचा आनंद घेतो असे मत मोदींनी व्यक्त केले.