जनतेमधील भाजपाचा विश्वास कायम आहे. मोदींच्या नेतृत्वात आज काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भाजपाचे विकासकाम दिसतेय, त्यामुळेच जगभरात मोदी – मोदीचा नारा घुमतोय, असे गौरवोद्गार अमित शाह यांनी गुजरातमधील सभेत काढले. नरेंद्र भाई मोदी सत्तेत आल्यानंतर गुजरातमधील दंगली कमी झाल्या. महिलांच्या सन्मानासाठी शौचालयाचा विचार सर्वात आधी मोदी यांनी केला, असे शाह म्हणाले.

मोदी यांच्या भाषणापूर्वी अमित शाह यांनी गुजरातमधील जनतेला संबोधित केले. यावेळी मोदींच्या विकासकामांबद्दल त्यांनी गौरवउद्गार काढले. मोदीं यांनी गुजरातमध्ये केलेला विकास भारतामध्ये पोहचवला. सर्वात मोठी पाण्याची समस्या सोडवली. मोदीं यांनी दहशवतवादाला जशास तसे उत्तर दिले. पाकिस्तानममधील दहशतवाद्यांना घुसून मारले. मोदींमुळे जगभरात गुजरातचे नाव झाल्याचे शाह यांनी सांगितले.

गुजरातमधील सर्वांना हात जोडून नमन करतो. येथील जनतेने २६ पैकी २६ जागा दिल्या. मोदी यांनी जेथून सुरूवात केली आज तेथेच आले आहेत. गुजरातमधील आचचा जयघोष बंगालपर्यंत गेला पाहिजे. नरेंद्र मोदी गुजरातचे गौरव आहेत, त्यांनी जगभरात गुजरातचे नाव केले, असे अमित शाह म्हणाले.

नरेंद्र मोदीं यांचं रविवारी सायंकाळी सहा वाजता अहमदाबाद विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर मोदी यांनी सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याला श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी उपस्थित होते. सरदार पटेल यांच्या पुतळ्याला श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर गुजरात भाजपा कार्यलयापर्यंत रोड शो करण्यात आला. ५० वर्ष जुने भाजपा कार्यलयाबाहेर झालेल्या सभेमध्ये मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. सुरतमध्ये झालेल्या दुर्घटनेत निष्पाप चिमुकल्यांचा बळी गेल्यामुळे गुजरात भाजपानं आपला जल्लोष कमी केला. नियोजित कार्यक्रम रद्द केले. अतिशय साधेपणानं मोदींचे स्वागत करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीत भाजपाने गेल्या निवडणुकीचे आकडे मागे टाकून अभूतपूर्व यश मिळवलं. एकट्या भाजपाने ३०३ जागा जिंकल्या आहेत. तर एनडीएने ३५० पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी मोदीच विराजमान होणार आहेत