सहाव्या टप्यातील मतदानांनंतर ३०० पेक्षा जास्त जागा मिळतील असा मला विश्वास विश्वास होता. हे मी दुसऱ्यांना सांगितले त्यावेळी माझी खिल्ली उडवली होती. पण, निकाल सर्वांसमोर आले. भारतीयांनी मला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. लोकांनी ठरवले होते की पुन्हा एकदा मजबूत सरकार द्यायचे आहे. म्हणूनच पुन्हा एकदा आम्हाला संधी दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

२०१४ नंतर लोकांनी मला ओळखले. पण त्यापूर्वी भारतीयांना गुजरातमधील विकास माहीत झाला होता. मला विजयाचा विश्वास होता. मात्र, विजय पचवण्याची क्षमता असायला पाहिजे. पुढील पाच वर्ष एकलव्यसारखे काम करणार आहे. पुढील पाच वर्ष भारतासाठी महत्वाची असल्याचे मोदी म्हणाले.

येथील लोकांच्या आशीर्वादासाठी मी आज येथे आलो आहे.  गुजरातमधील माझ्या लोकांचे आशीर्वाद हीच माझी ताकद आहे. तुमच्या प्रेमाला माझ्याजवळ शब्द नाही. माझ्या प्रिय धरतीसमोर मी नतमस्तक होतो. येथील लोकांनी मला शिकवले, संस्कार शिक्षण दिले, तेच आज मला कामाला येत असल्याचे मोदी यांनी सांगितले.  भाषणाच्या सुरूवातीलाच सुरत अग्नितांडवावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला. मृतांच्या कुटुंबियांना दुख: सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो..असे मोदी यांनी भाषणाच्या सुरूवातीला आपला शोक व्यक्त केला.

नरेंद्र मोदीं यांचं रविवारी सायंकाळी सहा वाजता अहमदाबाद विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर मोदी यांनी सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याला श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपवानी उपस्थित होते. सरदार पटेल यांच्या पुतळ्याला श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर गुजरात भाजपा कार्यलयापर्यंत रोड शो करण्यात आला. ५० वर्ष जुने भाजपा कार्यलयाबाहेर झालेल्या सभेमध्ये मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. सुरतमध्ये झालेल्या दुर्घटनेत निष्पाप चिमुकल्यांचा बळी गेल्यामुळे गुजरात भाजपानं आपला जल्लोष कमी केला. नियोजित कार्यक्रम रद्द केले. अतिशय साधेपणानं मोदींचे स्वागत करण्यात आले.

मोदी यांच्या भाषणापूर्वी अमित शाह यांनी गुजरातमधील जनतेला संबोधित केले. यावेळी मोदींच्या विकासकामांबद्दल गौरवउद्गार काढले. मोदीं यांनी गुजरातमध्ये विकास केला. सर्वात मोठी पाण्याची समस्या सोडवली. मोदीं यांनी दहशवतवादाला जशास तसे उत्तर दिले. पाकिस्तानममधील दहशतवाद्याला घुसून मारले. मोदींमुळे जगभरात गुजरातचे नाव झाल्याचे शाह यांनी सांगितले.

गुजरातमधील सर्वांना हात जोडून नमन करतो. येथील जनतेने २६ पैकी २६ जागा दिल्या. मोदी यांनी जेथून सुरूवात केली आज तेथेच आले आहेत. गुजरातमधील विजयाचा जयघोष बंगालपर्यंत गेला आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे गौरव आहेत. मोदी यांनी जगभरात गुजरातचे नाव केले, असे अमित शाह म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत भाजपाने गेल्या निवडणुकीचे आकडे मागे टाकून अभूतपूर्व यश मिळवलं. एकट्या भाजपाने ३०३ जागा जिंकल्या आहेत. तर एनडीएने ३५० पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी मोदीच विराजमान होणार आहेत