News Flash

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसा, टीएमसी-भाजपा कार्यकर्त्याची हत्या

राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्येसह गोळीबाराच्या घटनेमुळे वातावरण तणावग्रस्त

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज (रविवार) पश्चिम बंगालमधील आठ जागांवर मतदान सुरू आहे. मात्र, ही मतदान प्रक्रिया सुरू होण्याआधीच बंगालमध्ये एका भाजपा कार्यकर्त्याचा तर एका टीएमसी कार्यकर्त्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्येसह गोळीबाराच्या घटनेमुळे वातावरण तणावग्रस्त बनले आहे.

बंगालच्या झारग्राममध्ये भाजपच्या रामेन सिंह या बुथ कार्यकर्त्यांसह एका तृणमुल काँग्रेस कार्यकर्त्याचा मृतदेह आढळून आला आहे. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी त्याची हत्या केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. यशिवाय मिदनापूरमध्ये दोन टीएमसी कार्यकर्त्यावर गोळ्या झाडल्या आहेत. दोन्ही कार्यकर्त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

याबरोबरच बेल्दा येथील टीएमसीच्या कार्यालयावरही हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हा हल्ला भाजपाने केला असल्याचा आरोप टीएमसीकडून करण्यात आला आहे. एकुणच बंगालमध्ये मतदानाबरोबरच राजकीय हिंसाचाराच्या घडामोडींनी देखील वेग घेतल्याचे दिसत आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत होत असल्याने बंगालमधील लोकसभेच्या मतदानाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2019 11:17 am

Web Title: ahead of sixth pfase voting violence in west bengal bjp and tmc worker found dead
Next Stories
1 आंध्र प्रदेशमध्ये भीषण अपघात, खासगी बस-जीपच्या धडकेत 15 ठार
2 लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, भाजपासाठी कसोटी
3 सर्वांचा विकास हेच ध्येय
Just Now!
X