लोकसभा निवडणूकीबरोबरच आंध्रप्रदेशमध्ये विधानसभा निवडणूकांची मतमोजणी देखील होत आहे. कलांनुसार व हाती येत असलेल्या निकालांवरून राज्यातून तेलगू देसम पार्टीची गच्छंती निश्चित मानली जात आहे. तर निकाल पाहून टीडीपी अध्यक्ष व मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू राजीनामा देणार आहेत. राज्यात आता जगमोहन रेड्डींची पार्टी वायएसआर काँग्रेस सत्तेवर येणार आहे. जगमोहन रेड्डी यांनी २५ मे रोजी आमदारांची बैठक बोलावली आहे. एवढेच नाहीतर ३० मे रोजी ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार १७५ विधानसभेच्या जागांपैकी वायएसआर काँग्रेस तब्बल १४९ जागांवर पुढे आहे. तर नायडू यांची टीएमसी केवळ २५ जागांवर आघाडीवर होते. तर लोकसभा निवडणुकीच्या जागांवर वायएसआर काँग्रेस २३ तर टीडीपा केवळ दोन जागांवर आघाडीवर दिसत आहे.

राज्यात प्रामुख्याने चार पक्ष निवडणूकीच्या रिंगणात आहेत, ज्यामध्ये दोन पक्ष हे राष्ट्रीय तर दोन प्रादेशिक आहेत. राष्ट्रीय पक्षात काँग्रेस व भाजपा तर प्रादेशिक पक्षात टीडीपी व वायएसआर काँग्रेस यांचा समावेश आहे.