तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या गुगलने देशात सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याचे आवाहन या तरुणांसह सर्वच मतदारांना केले आहे. यासाठी गुगलने खास डुडल तयार केले असून यामध्ये बोटावर शाई लावल्याचे चित्र रेखाटण्यात आले आहे.
निवडणुका जाहीर झाल्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सरकारी आणि खासगी संस्थांकडून जनतेला विविध प्रकारे मतदानासाठी प्रेरित केले जात आहे. जाहिराती, स्ट्रीट प्ले, सेलिब्रिटींकडून आवाहन या मार्गे जनजागृती केली जाते. त्यातच सतत ऑनलाईन असणाऱ्या अबाल-वृद्धांवर गुगलचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे आता गुगलनेही मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गुगल इंडियाने नेहमीच विशेष प्रसंगानुरुप डुडल साकारले आहेत. त्यात आजच्या दिवसाचीही भर पडली असून देशातील लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचा असणारा आजचा मतदानाचा दिवस लक्षात घेता गुगलकडून अशा प्रकारे मतदानाचे आवाहन करण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 11, 2019 11:52 am