NDA ची बैठक उद्या (शनिवार) होणार आहे. या बैठकीत पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची औपचारिक निवड केली जाऊ शकते अशी शक्यता आहे. हा निर्णय घेतला गेला तरीही ती फक्त औपचारिकता आहे. कारण एनडीएने नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील असं एनडीएने जाहीर केलं होतं. दरम्यान या बैठकीला केंद्रीय मंत्री अरूण जेटली हजर रहाणार नाहीत त्यांची प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते या बैठकीला हजर रहाणार नाहीत असं स्पष्ट करण्यात आलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं. याच संदर्भात शनिवारी संध्याकाळी ५ वाजता बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत सगळे नवनिर्वाचित खासदार सहभागी होणार आहेत. तसंच शनिवारी भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठकीही शनिवारी पार पडणार आहे. भाजपाने या निवडणुकीत ३०२ जागा मिळवत इतिहास रचला. या बैठकीला अरूण जेटली प्रकृतीच्या कारणामुळे हजर राहू शकणार नाहीत.