लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या दमदार विजयावर एमआयआमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली असून, भाजपाने हिंदूंच्या मेंदूत फेरफार केल्याचं म्हटलं आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, ‘ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आलेला नाही, तर हिंदूंच्या मेंदूत फेरफार करण्यात आला’.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असदुद्दीन ओवैसी यांनी विरोधी पक्षांच्या एकता आणि धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विरोधी पक्ष राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाजपाचा सामना करु शकलं नाही अशी टीका असदुद्दीन ओवैसी यांनी केलं आहे. ओवैसी यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना सल्ला देताना म्हटलं आहे की, ‘भाजपाचा सामना करण्यासाठी आता नव्याने धोरणं आखण्याची गरज आहे’.

असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या पारंपारिक मतदारसंघातून निवडणूक जिंकत हैदराबादमधून विजय नोंदवला आहे. ‘राष्ट्रवादावर भाजपाचा सामना करु न शकल्याने विरोधकांचा दारुण पराभव झाला आहे. विरोधकांना आता नव्याने धोरणं आखण्याची गरज आहे. याशिवाय भाजपाकडे जे निवडणूक तंत्र आहे, त्याने भाजपाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे’.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asaduddin owaisi lok sabha election result evm narendra modi hindu
First published on: 24-05-2019 at 14:16 IST