19 September 2020

News Flash

‘मित्रा तू खरंच चुकलास’, राज ठाकरेंबद्दल शेलारांचे भावनिक उद्गार

आशिष शेलार आणि राज ठाकरे हे व्यक्तिगत जीवनात परस्परांचे चांगले मित्र आहेत. राजकारणापलीकडे असणारी त्यांची मैत्री सर्वांनाच माहित आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभर प्रचारसभांचा धडाका लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक आरोप केले होते. मोदींची जुनी भाषण, जाहीरातीचे व्हिडिओ दाखवून भाजपाच्या दाव्यांची पोलखोल केली होती. या सर्व टीकेला भाजपाने आज वांद्रयाच्या रंगशारदा सभागृहामध्ये ‘बघाच तो व्हिडिओ’ च्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले.

राज ठाकरेंनी केलेले आरोप कसे अर्धवट, अर्धसत्यावर आधारीत आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून राज ठाकरेंच्या दाव्यांची पोलखोल करताना भावनिक उदगारही काढले.

आशिष शेलार आणि राज ठाकरे हे व्यक्तिगत जीवनात परस्परांचे चांगले मित्र आहेत. राजकारणापलीकडे असणारी त्यांची मैत्री सर्वांनाच माहित आहे. आशिष शेलारांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली तरी अनेकदा ते कृष्णकुंजवर राज ठाकरेंना भेटायला जात असतात. राज ठाकरेंनी या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. आपल्या प्रचारसभांमधून ते भाजपा-शिवसेनेच्या उमेदवारांना पराभूत करण्याचे आवाहन करत आहेत. तोच धागा पडकडून आशिष शेलार यांनी ‘मित्रा तू खरंच’ चुकलास असे भावनिक उदगार काढले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 1:50 pm

Web Title: ashish shelar imotional sentence about raj thackeray
Next Stories
1 राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्याचा राहुल गांधींचा सल्ला धक्कादायक होता – विखे पाटील
2 इम्रान खानच्या प्लानप्रमाणे राज ठाकरे का बोलतात? भाजपाचा सवाल
3 अशी असेल २० रुपयाची नवी नोट; RBI ने जारी केला फोटो
Just Now!
X