पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार की पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस सत्तेत येणार? आज हे चित्र स्पष्ट होईल. पश्चिम बंगालमधील २९४ पैकी २९२ विधानसभा जागांचे निकाल आज हाती येणार आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व जागांचे कल हाती आले आहेत. सध्या सत्तेत असणाऱ्या ममता बॅनर्जींच्या तृणमूलला स्पष्ट बहुमत मिळतानाचे चित्र दिसत आहे. असं असलं तरी भाजपानेही मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा दमदार कामगिरी केल्याचं चित्र दिसत आहे. तृणमूल काँग्रेसने १९४ जागांवर आघाडी घेतली असून भाजपा मात्र १०० च्या आतच रोखली जाण्याची शक्यता आहे. भाजपा ९३ जागांवर आघाडीवर आहे. याच पार्श्वभूमीवर बंगालमध्ये आता तृणमूल सत्तेची हॅटट्रीक मारणार यावर केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे असं समजलं जात आहे. मतमोजणीचे आकडे समोर आल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर ट्विटरवरुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली जात आहे.

मतता बॅनर्जी यांनी मोदी-शाह यांच्यासोबतच अनेक केंद्रीय यंत्रणा, प्रसारमाध्यमे अशा अनेकांविरुद्ध असणारी ही लढाई सहज जिंकली आहे, पश्चिम बंगाल हा दुर्गेची पुजा करणार आहे, एकटीने करुन दाखवलं, मोदी शहांना कसं हरवावं हे ममतांनी दाखवून दिलं अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मिडियावर उमटताना दिसत आहेत. पाहूयात काही व्हायरल ट्विट…

१) या सर्वांविरोधात लढल्या

२) एकटीने करुन दाखवलं

३) मोदी शहांना कशी टक्कर द्यावी हे शिकवलं

४)मिम्समधून टीका

५) एकट्या लढल्या

६ )दुर्गाच

७) बंगाली लोकं दुर्गाची पुजा करतात

८) एकट्या विरुद्ध

९) बंगालकडून मिळालेला फटका

१०)हा असा सामना होता

११) अभिनंदन

१२) एवढी ताकद लावून लढलात

१३) जलवा

१४) चाहता नाही पण…

१५) आता मजा येणार

सर्व जागांचे कल हाती आले असून तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेर हालचाली सुरु झाल्या आहेत.ममता बॅनर्जींच्या निवासस्थानाबाहेर मोठा तंबू उभारण्यात आला असून मोठे स्क्रीनही लावण्यात आले आहेत.