निवडणूक आयोगाने शुक्रवारी चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश (पुदुचेरी) मधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. राजकीय दृष्टया संवेदनशील असलेल्या पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात तर आसाममध्ये तीन फेजमध्ये मतदान होईल. मतदान प्रक्रिया २७ मार्चला सुरु होईल. तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीमध्ये एकाच टप्प्यात सहा एप्रिलला मतदान होणार आहे. सर्व राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांचे निकाल दोन मे रोजी जाहीर होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. १८.६८ कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. २.७ लाख मतदान केंद्र असणार आहेत” अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या सर्वाधिक २९४, तामिळनाडूत २३४, केरळमध्ये १४०, आसाममध्ये १२६ आणि पुदुचेरीत ३० विधानसभा जागांसाठी मतदान होईल. नोव्हेंबर २०२० मध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर आता करोनाकाळात या पाच राज्यांमध्ये निवडणूक होत आहे.

आसाम निवडणूक कार्यक्रम
आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान होईल.
पहिल्या फेजमध्ये २७ मार्चला, त्यानंतर एक एप्रिल आणि सहा एप्रिलला शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल.

पश्चिम बंगाल निवडणूक कार्यक्रम ( एकूण २९४ जागा)
राजकीय दृष्टया संवेदनशील असलेल्या पश्चिम बंगालमध्ये आठ फेजमध्ये मतदान होणार आहे.

पुदुचेरी निवडणूक कार्यक्रम (३० जागा)
केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरीमध्ये एका फेजमध्ये निवडणूक होईल.
अधिसूचना जारी होणार – १२ मार्चला
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – १९ मार्च
उमेदवारी अर्जाची छाननी – २० मार्च
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – २२ मार्च
केरळमध्ये मतदान – सहा एप्रिल
मतमोजणी – दोन मे

तामिळनाडूचा निवडणूक कार्यक्रम (२३४ जागा)
तामिळनाडूत विधानसभेच्या २३४ जागांसाठी एका फेजमध्ये मतदान होईल.
अधिसूचना जारी होणार – १२ मार्चला
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – १९ मार्च
उमेदवारी अर्जाची छाननी – २० मार्च
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – २२ मार्च
केरळमध्ये मतदान – सहा एप्रिल
मतमोजणी – दोन मे

केरळचा निवडणूक कार्यक्रम (१४० जागा)
अधिसूचना जारी होणार – १२ मार्चला
उमेदवारी अर्जाची छाननी – २० मार्च
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – २२ मार्च
केरळमध्ये मतदान – सहा एप्रिल
मतमोजणी – दोन मे

करोनाकाळात या निवडणुका होत असल्याने प्रचारासाठी काही मार्गदर्शकतत्त्वे आखण्यात आली आहेत.
– दारोदार प्रचाराची उमेदवारासह फक्त पाच कार्यकर्त्यांना परवानगी असेल.
– रोड शो ला परवानगी देण्यात आली आहे.
– संशयित कोविड रुग्णासाठी स्वतंत्र नियम असतील.
– निवडणूक अधिकार्‍यांचे लसीकरण झालेले असेल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly elections in five states ec announces poll schedule for west bengal kerala tamil nadu assam puducherry dmp
First published on: 26-02-2021 at 17:20 IST