News Flash

लक्षवेधी लढत : ग्वाल्हेर

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर मतदारसंघ शिंदे राजघराण्याचे प्रभावक्षेत्र मानले जाते. १

(संग्रहित छायाचित्र)

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर मतदारसंघ शिंदे राजघराण्याचे प्रभावक्षेत्र मानले जाते. १९६२ मध्ये राजमाता विजयाराजे शिंदे येथून काँग्रेसकडून विजयी झाल्या होत्या. त्यानंतर १९८४ पासून ते १९९८ पर्यंत पाच वेळा त्यांचे पुत्र माधवराव शिंदे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. पुढे २००७ व २००९ मध्ये माधवराव शिंदे यांच्या भगिनी यशोधराजे या भाजपकडून विजयी झाल्या. गेल्या वेळी केंद्रात मंत्री असलेले नरेंद्र तोमर ग्वाल्हेरमधून विजयी झाले. यंदा तोमर यांनी मतदारसंघ बदलला आहे. त्यांच्या जागी भाजपने ग्वाल्हेरचे महापौर विवेक शेजवलकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून दिग्विजय सिंह यांचे कट्टर समर्थक अशोक सिंह रिंगणात आहेत. गेल्या वेळी अशोक सिंह चुरशीच्या लढतीत पराभूत झाले होते. २००९ मध्येही त्यांचा निसटता पराभव झाला होता. यंदा राज्यात काँग्रेसची सत्ता आल्याने ग्वाल्हेर मतदारसंघात दोनदा विजयाने हुलकावणी दिल्याने यंदा त्यांना येथून यशाची अपेक्षा आहे. दुसरीकडे येथे भाजपचे संघटन उत्तम आहे. शेजवलकर हे संघाच्या जवळचे मानले जातात. त्यातच ते महापौर असल्याने परिचित चेहरा आहे. त्यामुळे ग्वाल्हेरमधून अटीतटीचा सामना होण्याची चिन्हे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 1:15 am

Web Title: attractive fight gwalior constituency
Next Stories
1 देशात दहशतवादी, जिहादी संघटना कार्यरत; पाक लष्करी अधिकाऱ्याची कबुली
2 राज्यात चौथ्या टप्प्यात ५७ टक्के मतदान; निवडणूक आयोगाची माहिती
3 लोकशाहीची गळचेपी होते..म्हणणाऱ्यांचं थोबाड फोडलं पाहिजे-विक्रम गोखले
Just Now!
X