News Flash

केंद्रातील भाजप सरकारकडून लोकांचा विश्वासघात – प्रियंका

 काँग्रेसचे उमेदवार व आपले बंधू राहुल गांधी यांचा लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

संग्रहित छायाचित्र

केंद्रातील भाजपप्रणीत एनडीए सरकार ज्या लोकांनी सत्तेवर आणले त्यांच्याच  विश्वासघात करीत आहे असा आरोप काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी येथे केला.

पूर्व उत्तर प्रदेशच्या सूत्रधार असलेल्या प्रियंका यांनी असा आरोप केला की, एनडीए सरकारने देल्या पाच वर्षांत केवळ देशात फूट पाडण्याचे काम केले. हा माझा देश आहे. या टेकडय़ा, उत्तर प्रदेशातील गव्हाची शेते हा माझा देश आहे. तामिळनाडू हा माझा देश आहे, गुजरात हा माझा देश आहे, ईशान्य हा माझा देश आहे, पण भाजपने गेल्या पाच वर्षांत काय केले तर देशातील लोकांमध्ये फूट पाडली. पाच वर्षांपूर्वी लोकांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच आता विश्वासघात केला आहे. हे सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांनी लोकांचा  विश्वासघात केला. शेतकऱ्यांना उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले, तरुणांना दोन कोटी रोजगारांची आशा दाखवली पण सत्तेवर आल्यानंतर ते ज्यांनी सत्ता दिली त्यांना विसरून गेले. सत्ता आपलीच आहे लोकांची नाही असे आता भाजपला वाटत आहे.

काँग्रेसचे उमेदवार व आपले बंधू राहुल गांधी यांचा लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

गांधी कुटुंबाचे आयुष्य, आजीचा मृत्यू, नंतर वडिलांचा मृत्यू, राहुल गांधी यांचे शिक्षण, स्वभाव व इतर अनेक गोष्टी यांचा समावेश करीत त्यांनी भावपूर्ण भाषण केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2019 1:13 am

Web Title: betrayal of the central government priyanka
Next Stories
1 पंतप्रधानांना निवडणुकीतील संभाव्य पराभवाचा भयगंड – ममता
2 रोहितचे पत्नीशी संबंध पहिल्या दिवसापासून बिघडलेले – उज्ज्वला तिवारी
3 साध्वी प्रज्ञासिंगवर गुन्हा दाखल करा – अशोक चव्हाण
Just Now!
X