24 January 2020

News Flash

संघर्ष समितीला ‘शिंदेशाही’चे वावडे

२७ गावांनी बहिष्कार टाकल्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका यापूर्वी होऊ शकल्या नाहीत.

(संग्रहित छायाचित्र)

भगवान मंडलिक, कल्याण

कल्याण-डोंबिवलीलगतच्या २७ गावांमधून यंदा शिवसेनेला जोरदार विरोध करण्याची तयारी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपशी घरोबा करणाऱ्या समितीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांचा झेंडा खांद्यावर घेतला असून ठाणे, कल्याण परिसरातील शिंदेशाहीला शह देण्याची भाषा या गावांमधून केली जात आहे.

२७ गाव संघर्ष समितीचा महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा असल्याचे वृत्त खोटे असून समितीने बाबाजी पाटील यांना पाठिंबा दिला आहे, अशी माहिती संघर्ष समितीचे मुख्य पदाधिकारी चंद्रकांत पाटील यांनी दिली. संघर्ष समितीत युवा मोर्चा, युवा सेना असे प्रकार आहेत. आगरी समाज म्हणून आम्ही या युवा संघटनांशी सहमत असलो तरी पक्षीय पातळीवर आम्ही त्यांच्याशी सहमत नाहीत. समितीचा भाग असलेली युवा गटातील मंडळी महायुतीत सहभागी आहेत. त्यामुळे संघर्ष समिती आमच्या बरोबर आहे, असा दावा शिवसेना-भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. तो सपशेल चुकीचा आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

२७ गावांनी बहिष्कार टाकल्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका यापूर्वी होऊ शकल्या नाहीत. या बहिष्काराला पालकमंत्री शिंदे यांनीही पाठिंबा दिला होता. ही समितीची ताकद आहे. चार वर्षांपूर्वी कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्यावेळी आमचा सहभाग पालिकेत नको म्हणून आम्ही पालिका निवडणुकांवर बहिष्कार टाकला. गावांची नगरपालिका होणार की नाही या विषयावर समिती पदाधिकाऱ्यांनी चार वेळा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मात्र त्यांनी आम्हाला साथ दिली नाही, असे पाटील यांनी सांगितले. मग, भाजपचे नेते, मंत्री आमच्या दारात आले. त्यांनी समितीने बहिष्कार कायम ठेवला तर २१ प्रभागांमध्ये शिवसेनेचे नगरसेवक बिनविरोध निवडून येतील असे सांगितले. त्यामुळे बहिष्कार झुगारून पालिका निवडणूक लढवावी लागली. निवडणुका लढवून गावांच्या पदरात विकासाच्या माध्यमातून काहीही पडले नाही, असे ते म्हणाले.

कल्याण लोकसभा मतदारसंघ पट्टय़ातील सर्व आगरी समाज निष्ठावान, कट्टर शिवसैनिक आणि महायुतीचा मतदार आहे. महायुतीला आघाडी मिळवून देण्यात अन्य मतदारांबरोबरच आगरी समाजातील मतांचा मोठा वाटा असणार आहे. 

रवींद्र चव्हाण, भाजप नेते

शिवसेनेचा मतदार कधी कोणत्या राजकीय पक्षाच्या वळचणीला जात नाही. आतापर्यंत आगरी समाजाच्या भाजप आमदारांनी या शहरांचे नेतृत्व केले. आगरी समाजाचा महायुतीला भक्कम पाठिंबा आहे.

सदानंद थरवळ, उपजिल्हाप्रमुख डोंबिवली

First Published on April 24, 2019 2:55 am

Web Title: bjp activist support ncp candidate babaji patil in lok sabha elections
Next Stories
1 मुंबईच्या आखाडय़ात ४ निरक्षर, ४५ पदवीधर!
2 मतदारसंघाचा चांगला विकास झाला
3 विकास कुठे दिसलाच नाही !
Just Now!
X