News Flash

दोन व्होटर आयडी असल्याने भाजपाची अरविंद केजरीवालांच्या पत्नीविरोधात तक्रार

भाजपाकडून सुनिता केजरीवाल यांच्याविरोधात तक्रार दाखल

BJP Files Complaint against arvind Kejriwal’s Wife : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्याकडे दोन व्होटर आयडी असल्याची तक्रार भाजपाने नोंदवली आहे. सुनीता केजरीवाल यांच्याकडे एक व्होटर आयडी गाझियाबादचे आहे. तर दुसरे व्होटर आयडी सिव्हील लाईन्सचे आहे.

याचप्रकरणी भाजपा नेते हरिश खुराणा यांनी दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात तक्रार दाखल केली आहे. याआधी भाजपाची उमेदवारी मिळालेल्या गौतम गंभीरकडे दोन मतदान ओळखपत्र असल्याचे आरोप आम आदमी पक्षाने केले होते. ज्यावर पलटवार करत भाजपाने आधी स्वतः काय करत आहात ते पहा मग आम्हाला नावं ठेवा असा टोला लगावला.

गंभीर यांच्या विरोधात उभा असलेल्या आम आदमी पक्षाच्या उमेदवार आतिशी मर्लेना यांनी न्यायालयात धाव घेत गंभीर यांच्याकडे २ मतदार ओळखपत्र असल्याने त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी केली होती. दिल्लीचे भाजप प्रवक्ते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराना यांचे पुत्र हरीश खुराना यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पत्नीकडे दोन मतदार ओळखपत्र असल्याचे ट्वीट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 2:30 pm

Web Title: bjp files complaint against arvind kejriwals wife alleges she holds two voter ids
Next Stories
1 राहुल गांधींना गृहमंत्रालयाची नोटीस, राजनाथ सिंह म्हणतात…
2 यती दंतकथा की वास्तव? जाणून घ्या हिममानवाचा रहस्यमय इतिहास
3 भाजपाचा प्रचार करणाऱ्या कुत्र्याला घेतले ताब्यात, महाराष्ट्रातील घटना
Just Now!
X