केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रकाशित केला. भाजपाने आपल्या जाहीरनाम्याला संकल्प पत्र असे नाव दिले आहे. ११ एप्रिलला होणाऱ्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या तीन दिवसआधी भाजपाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला.

संकल्प पत्रामध्ये जनतेला ७५ वचन देण्यात आली असून लोकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. भाजपाने देशातील जनतेला पारदर्शक, मजबूत आणि निर्णायक सरकारचे आश्वासन दिले असून भाजपाला पुन्हा निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले. आमच्या संकल्प पत्रातून लोकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

मागच्या पाच वर्षात नरेंद्र मोदी यांनी देशाला निर्णायक सरकार दिले. दहशतवादाचे उगम स्थान असलेल्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक करण्याचा निर्णय घेतला असे शाह म्हणाले. या स्ट्राइकमधून मोदी सरकारने यापुढे भारताला हलक्यामध्ये घेऊ नका असा कठोर संदेश दिला. भारताचा २०१४ ते २०१९ मध्ये झालेला विकास इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. २०१४ साली भारतीय अर्थव्यवस्था ११ व्या स्थानी होती आज जगात आपण सहाव्या स्थानावर आहोत असे शाह म्हणाले.