23 September 2020

News Flash

मनसेच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ला भाजपाकडून ‘बघाच तो व्हिडिओ’ ने उत्तर

राज ठाकरेंच्या ३२ प्रकरणांचा आढावा घेण्याची आमची तयारी आहे पण वेळेअभावी १९ प्रकरण दाखवणार असे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले.

वांद्रयाच्या रंगशारदा सभागृहात भाजपाची सभा सुरु आहे. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपाकडून त्यांच्याच स्टाईलमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. मनसेच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ला भाजपाकडून ‘बघाच तो व्हिडिओ’च्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले जात आहे.

राज ठाकरे यापूर्वी राहुल गांधी, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्याबद्दल काय बोललो होते. त्यांच्यावर कशी टीका केली होती. ते राज ठाकरे यांचे जुने व्हिडिओ दाखवले.

राज ठाकरेंच्या ३२ प्रकरणांचा आढावा घेण्याची आमची तयारी पण वेळेअभावी १९ प्रकरण दाखवणार असे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले. असत्य आणि अर्धवट गोष्टींवर राजकारण करण्याची राज ठाकरें तुमची प्रवृती आहे. खोटं बोलं, रेटून बोलं म्हणजे राज ठाकरे अशी टीका आशिष शेलार यांनी केली. आशिष शेलार हे राज ठाकरेंचे जवळचे मित्र आहेत. त्यांनी भाषणामध्ये ‘मित्रा तू खरचं चुकलास’ असे उदगार काढले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 11:35 am

Web Title: bjp mumbai chief ashish shelar slam raj thackreray
Next Stories
1 राजकारणात येणाऱ्या स्त्रियांसाठी उर्मिला मातोंडकर यांचा महत्त्वपूर्ण संदेश
2 काँग्रेस जीना यांचा पक्ष, स्वातंत्र्य लढ्यात त्यांचाही सहभाग : शत्रुघ्न सिन्हा
3 श्रीलंका : सुरक्षा रक्षकांना मोठे यश, चकमकीत ‘आयएस’चे १५ दहशतवादी ठार
Just Now!
X