भाजपला स्वबळावर बहुमत

संसदीय पक्षाच्या बैठकीत उद्या नेतानिवड

राहुल यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली

जनमताची नस पकडण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकवार यशस्वी ठरले असून २०१४चीच पुनरावृत्ती करीत २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दमदार विजय मिळवला आहे. २०१४मध्ये भाजपने २८२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी तब्बल ३०० जागांपर्यंत पक्षाने धडक दिली असल्याने एकहाती सत्ता स्थापित करण्याची क्षमता या पक्षाने कायम राखली आहे. भाजप संसदीय पक्षाची बैठक शनिवारी होत असून त्यात मोदी यांची पंतप्रधानपदी निवड केली जाईल. त्यानंतर सत्तास्थापनेसाठी राष्ट्रपतींची भेट घेतली जाईल.

गेल्या निवडणुकीत काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या होत्या. हा पक्ष ५२ जागांवर आघाडीवर असल्याने यावेळी त्यांची स्थिती किंचित सुधारली असली तरी भारतीय राजकारणावर मोदींची नाममुद्राच पुन्हा एकवार कोरली गेली आहे. इतकेच नव्हे, तर यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठीचा बालेकिल्ला गमावला आहे. राहुल गांधी यांनी लोकमताचा स्वीकार करीत असल्याचे सांगितले.

पक्षीय बलाबल

भाजप+ ३४९

अन्य १०७

काँग्रेस+ ८६