News Flash

“…त्यापेक्षा निवडणूक आयोग बरखास्त करुन सगळा कारभार भाजपाच्या हाती द्या”

निवडणूक आयोगाला प्रशासनातील लोकांनी मदत केल्याचाही आरोप

फाइल फोटो (सौजन्य: पीटीआय)

आसाममध्ये एका भाजपा उमेदवाराच्या गाडीमध्येच ईव्हीएम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्यामध्ये सुरु असणाऱ्या विधानसभा निवडणुकींचा दुसरा टप्पा गुरुवारी पार पडला. गुरुवारी आसाममधील ३९ जागांसाठी मतदान झालं. मात्र कालच निवडणुसाठी मतदान संपल्यानंतर रात्री एका ठिकाणी चक्क भाजपा उमेदवाराच्या गाडीमध्येच मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम सापडल्या. यासंदर्भात सर्वच विरोधी पक्षांनी भाजपावर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगाने याबद्दल स्पष्टीकरणही दिलं आहे. मात्र राष्ट्रीय जनता दलचे नेते आणि बिहारचे विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोग हवाय कशाला अशी उपरोधिक भूमिका घेतलीय. निवडणूक आयोगाऐवजी सर्व कारभार थेट भाजपाच्या हाती द्यावा असा उपरोधिक टोला त्यांनी लगावलाय आहे.

तेजस्वी यादव यांनी निवडणुक आयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या ईसीआयचा शॉर्टफॉर्म आपल्या ट्विटमध्ये विश्वार्हता संपत चालेलं आयोग असा केला आहे. अशाप्रकारे पडद्यामागून काम करण्यापेक्षा थेट निवडणूक आयोग बरखास्त करावं आणि त्याचा संपूर्ण कारभार भाजपाच्या हाती द्यावा, असा टोला तेजस्वी यांनी लगावला आहे. इतकच नाही तर बिहारमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक सुद्धा निवडणूक आयोगानेच स्वार्थ साधण्यासाठी ताब्यात घेतली. यासाठी त्यांना प्रशासनातील लोकांनी मदत केली आणि भाजपा व जेडीयूचा विजय झाला, असा गंभीर आरोपही तेजस्वी यांनी केलाय.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनाही लोकशाहीची परिस्थिती वाईट झाल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी अगदी मोजक्या शब्दात लोकशाहीवरुन भाजपाला सुनावलं आहे. निवडणुक आयोगाची गाडी खरा, भाजपाची नियत खराब आणि लोकशाहीची परिस्थिती खराब, असं म्हणत ईव्हीएम हॅशटॅगसहीत राहुल गांधींनी ट्विट केलं आहे.

नक्की काय घडलं?

मतदानानंतर रात्रीच्या वेळी पकडण्यात आलेल्या एका भाजपा उमेदवाराच्या गाडीसंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओत गाडीमध्ये ईव्हीएम मशीन सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ज्या गाडीमध्ये हे ईव्हीएम मशीन सापडले, ती कार भाजपा उमेदवाराची असल्याचं समोर आलं आहे. या घटनेची चर्चा सुरू झाल्यानंतर निवडणूक आयोगाने यावर खुलासा केला आहे. “ज्या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ती कार भाजपा उमेदवार कृष्णेंदू पाल यांची आहे. कृष्णेंदू पाल पाथरकांडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. निवडणूक आयोगाची गाडी बंद पडली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी एका गाडीला लिफ्ट मागितली. नंतर ही कार भाजपा उमेदवाराची असल्याचं कळालं,” असं आयोगाने सांगितलं आहे. याच वरुन राहुल यांनी भाजपावर निशाणा साधलाय.

लोकांनी या घटनेची तक्रार केल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी गाडीमध्ये ना मतदान अधिकारी होता, ना निवडणूक आयोगाचा कर्मचारी. या प्रकरणी निवडणूक आयोगाने करीमगंज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून, याप्रकरणी चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2021 4:25 pm

Web Title: bjp should fully take over all election commission functioning tejashwi yadav slams after evm issue in assam scsg 91
टॅग : आसाम
Next Stories
1 “निवडणूक आयोगाची गाडी खराब, भाजपाची नियत खराब, लोकशाहीची हालत खराब”
2 काँग्रेसकडून हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचं काम, मोदींचं धोरण ‘सबका साथ सबक का विकास’: अमित शाह
3 Kerala election : भाजपानं पाच वर्षांपूर्वी केरळमध्ये खातं उघडलं, यंदा आम्ही ते बंद करणार – मुख्यमंत्री विजयन
Just Now!
X