महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात अनेक प्रचारसभा घेतल्या. या प्रचार सभांना प्रचंड गर्दीही झाली. मात्र विधानसभेच्या निवडणुकांप्रमाणेच यंदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या गर्दीचे परिवर्तन मतांमध्ये झाले नाही. राज यांच्या 'लाव रे तो व्हिडिओ'ची चांगलीच चर्चा झाली होती. तरी याचा परिणाम मतदानावर झालेल्याचे चित्र मतमोजणीदरम्यान दिसत नाही. राज यांनी सभा घेतलेल्या सर्व १० मतदारसंघांमध्ये शिवसेना-भाजपा युतीचेच उमेदावर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी प्रचार करणारे राज ठाकरे सध्या सोशल नेटवर्किंगवर ट्रोल होताना दिसत आहेत. पाहुयात असेच व्हायरल झालेले ट्विट. ते सकाळी उठेपर्यंत राज ठाकरे सकाळी उठेपर्यंत मोदी पुन्हा पंतप्रधान झाले सुद्धा साहेब आता कोणता विडिओ लावायचा? — A Common Man (@Acchu4u123) May 23, 2019 तुझा राज ठाकरे होईल नवीन वाक्यप्रचार: " चूप बस लेका, राज ठाकरे होईल तुझा"#म #मराठी #मोदी #राजठाकरे — कृष्णवत्सल (@Mr_GRMore) May 23, 2019 अशीही आघाडी कृष्णकुंजवरुन राज ठाकरे आघाडीवर. — Mayur.BTL. (@mayurMg8) May 23, 2019 राज यांनी काढला आदेश *सर्वात मोठी ब्रेकींग न्यूज...* *राज ठाकरे यांनी आदेश काढला* *'बंद कर रे तो व्हिडीओ'* — Awasthi pradeep (@Awasthipradeep1) May 23, 2019 हे होणारच होतं My god.. Cong yet to open account even in Maharashtra.. Raj Thackeray was hero of Cong to fight NDA.. Ha.. Ha.. Ye to hona hi tha — SKR (@shashiasha) May 23, 2019 निकाल दाखवताना People of #Maharashtra showing #ElectionResults2019 to Raj Thackeray.pic.twitter.com/CR3yxZqXh6 — Vardan Pandhare (@VardanPandhare) May 23, 2019 लाव रे तो न्यूज चॅनेल लाव रे news channel BJP:326+ @RajThackeray @mnsadhikrut #घासून_नाय_ठासून — prasanna (@Prasannak__) May 23, 2019 ते झोपेतून उठले का? Has liberal icon Raj Thackeray woken up from bed yet? — Chowkidari Enthusiast (@IndiaSpeaksPR) May 23, 2019 महाराष्ट्रात राज ठाकरेंची लाट Massive Raj Thackeray wave seen in Maharashtra. — कुशल मेहरा (@kushal_mehra) May 23, 2019 राज यांची मुलाखत घ्या ना Any nes chennal please interview Raj Thackeray #ElectionResults2019 — Chowkidar Parag Rudani (@ParagRudani) May 23, 2019 निरुपयोगी Any nes chennal please interview Raj Thackeray #ElectionResults2019 — Chowkidar Parag Rudani (@ParagRudani) May 23, 2019 राज यांनी लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान १२ एप्रिल ते २६ एप्रिल दरम्यान राज्यभरामध्ये एकूण १० सभा घेतल्या. यामध्ये नांदेड (१२ एप्रिल), सोलापूर (१५ एप्रिल), कोल्हापूर (१६ एप्रिल), सातारा (१७ एप्रिल), पुणे (१८ एप्रिल), महाड (रायगड) (१९ एप्रिल), काळाचौकी (मुंबई) (२३ एप्रिल), भांडुप (पश्चिम, मुंबई) (२४ एप्रिल), कामोठे (पनवेल) (२५ एप्रिल) आणि नाशिक (२६ एप्रिल) या दहा ठिकाणी सभा घेतल्या होत्या. यासभांद्वारे त्यांनी मोदी-शाह जोडगोळीवर जोरदार हल्ला चढवला होता. राज यांच्या सभांचा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना नक्कीच फायदा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या चार तासांमध्ये हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या सर्वच जागांवर शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदावरांना आघाडी मिळाल्याचे दिसत आहे. राज यांनी सभा घेतलेल्या बहुतेक सर्वच जागांवर महाआघाडीचे उमेदवार पिछाडीवर आहेत.