News Flash

भाजपाने कुमारस्वामींना पैशांची ऑफर दिली, देवेगौडांचा धक्कादायक खुलासा

कुमारस्वामी यांनी ही ऑफर स्वीकारली नाही असेही देवेगौडा यांनी म्हटले

भाजपाने निवडणुकांपूर्वी जेडीएससोबत सत्ता स्थापन करण्यासाठी कुमारस्वामींना पैशांची मोठी ऑफर दिली होती असा धक्कादाक खुलासा जेडीएसचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी देवेगौडा यांनी केला आहे. कुमारस्वामींनी भाजपाची ऑफर नाकारली एवढंच नाही तर या प्रकरणात कुमारस्वामींना मुंबईला बोलवण्यात आलं होतं पण ते गेले नाहीत तसेच कोणतीही ऑफर त्यांनी स्वीकारली नाही असेही देवेगौडा यांनी म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे काही आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याची बातमी आली होती. मात्र कुमारस्वामी सरकार पडले नाही. त्याच काळात कुमारस्वामींनाही पैशांची मोठी ऑफर देण्यात आली होती असा धक्कादायक खुलासा देवेगौडा यांनी केला आहे.

आमचा पाठिंबा घ्या आणि सरकार स्थापन करा असे सांगत भाजपाने कुमार स्वामींना मोठ्या रकमेची ऑफर दिली. मात्र ही ऑफर कुमारस्वामींनी स्वीकारली नाही. मुंबईत पैसे ठेवण्यात आले आहेत तुम्ही ते घ्यायला या असेही त्यांना सांगण्यात आले होते. मात्र कुमारस्वामी कुठेही गेले नाहीत असेही देवेगौडा यांनी स्पष्ट केले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2019 8:06 pm

Web Title: bjp tried to persuade kumaraswamy to form govt with the support of bjp
Next Stories
1 दादासाहेब मुंडेंना मारहाण करणाऱ्या भाजपाच्या गुंडांना अटक करा-धनंजय मुंडे
2 शिवसेना पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक लढवणार
3 लालुंच्या कुटुंबात संघर्ष, मोठा मुलगा तेज प्रतापने दिला राजीनामा
Just Now!
X