News Flash

उत्तर प्रदेशातील मतदान केंद्रात जवानांचा हवेत गोळीबार

ओळखपत्रांशिवाय मतदानसाठी आलेल्या काही लोकांनी मतदान केंद्रांमध्ये बळजबरीने शिरण्याचा प्रयत्न केला

| April 12, 2019 03:39 am

बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यामुळे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी हवेत गोळीबार केला.

कैराना : उत्तर प्रदेशातील कैराना मतदारसंघात ओळखपत्र जवळ नसलेल्या काही लोकांनी गुरुवारी मतदान करण्यासाठी मतदान केंद्राच्या परिसरात बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यामुळे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी हवेत गोळीबार केला.

ही घटना कांढला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रसूलपूर गुजरान खेडय़ातील एका मतदान केंद्रावर दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सागितले.

ओळखपत्रांशिवाय मतदानसाठी आलेल्या काही लोकांनी मतदान केंद्रांमध्ये बळजबरीने शिरण्याचा प्रयत्न केला. मतदान अधिकाऱ्याने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता धक्काबुक्की झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रावर तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांनी हवेत गोळीबार केल्यानंतर गोंधळ झाला. नंतर पोलीसही घटनास्थळी पोहचले. परिस्थिती आता नियंत्रणाखाली असून मतदान सुरळीतपणे सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी सांगितले.

गावकऱ्यांनी मात्र पोलिसांचे म्हणणे नाकारले. मतदान अधिकाऱ्यांनी आपली मते समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला टाकली, मात्र आपल्याला इतर कुणाला मतदान करायचे होते असा आरोप अजमेर सिंह व पहलसिंह या दोन गावकऱ्यांनी केला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून बीएसएफच्या जवानांनी हवेत गोळीबार केला व त्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले, असा दावा गावकऱ्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 3:39 am

Web Title: bsf opens fire in kairana constituency as voters try to vote without id card
Next Stories
1 आमदार सामंत-पोलीस अधिकाऱ्यांनी खोटय़ा गुन्ह्यात गोवले
2 ‘विकिलीक्स’ सहसंस्थापक ज्युलियन असांजला अटक
3 ‘निवडणूक रोख्यां’वरून केंद्र आणि आयोगात मतभेद
Just Now!
X