News Flash

BSP ऐवजी चुकून BJP समोरील बटन दाबले, मायावतींच्या कार्यकर्त्याने स्वत:चे बोट कापले

बोट कापणाऱ्या या कार्यकर्त्याचे वय अवघे २५ वर्ष इतके आहे

मायावतींच्या कार्यकर्त्याने स्वत:चे बोट कापले

लोकसभा निवडणुकांसाठीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडले. देशभरातील ९५ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर मतदारसंघाचाही या ९५ मतदारसंघांमध्ये समावेश होता. मात्र या मतदारसंघात मतदान करणाऱ्या एका तरुणाने चुकून भाजपाला मत दिल्यामुळे प्रायश्चित म्हणून आपले बोट कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचा कार्यकर्ता असणाऱ्या या तरुणाने बीएसपी ऐवजी चुकून बीजेपी समोरील बटन दाबल्याने त्याचे मत भाजपा उमेदावराला गेले म्हणून तो निराश झाला होता.

बुलंदशहरमध्ये सध्याचे भाजपा खासदार भोला सिंग आणि सपा-बसपा-राजद युतीचे योगेश वर्मा यांच्यामध्ये थेट लढत रंगली आहे. काल झालेल्या मतदानामध्ये बसपाचा समर्थक असणाऱ्या पवन कुमार नावाच्या २५ वर्षीय तरुणानेही मतदान केले. शिक्रापूर येथील अब्दुल्लापूर हुलासन गावात राहणाऱ्या पवनला वर्मा यांना मतदान करायचे होते पण त्याने चुकून सिंग यांच्या नावासमोरचे बटन दाबले. मात्र आपली चूक लक्षात येईपर्यंत त्याचे मत नोंदवले गेले होते.

मतदान करताना झालेल्या या चुकीमुळे पवन स्वत:वरच खूप संतापला. मतदान करुन घरी आल्यानंतर रागाच्या भरात त्याने स्वत:चे बोट कापले. पवन याने एक व्हिडिओ ट्विटवर पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली. माझ्याकडून झालेल्या चुकीसाठी मी स्वत:चे बोल कापल्याचे पवनने सांगितले आहे. ‘हत्तीच्या चित्रासमोरील बटन दाबण्याऐवजी कमळामच्या फुलासमोरील बटन दाबल्याने मी माझे बोट कापून घेतले’ असं पवनने पत्रकारांशी बोलताना सांगितले. मतदान केल्यानंतर ज्या बोटाला शाई लावली जाते तेच डाव्या हाताचे बोट पवनने कापले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 10:27 am

Web Title: bsp supporter chops off his finger after voting for bjp by mistake
Next Stories
1 प्रचाररथ, रिक्षाचालकांचीही उत्तम कमाई
2 जो प्रचार करेगा उसका भला, ना करेगा..
3 मावळमध्ये २२ लाख ९७ हजार मतदार
Just Now!
X