लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भाजपा आणि मित्रपक्षांना स्पष्ट बहुमत दिल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. २०१४ पेक्षाही अधिक मोठा विजय झाल्याने भाजपाच्या नेत्यांबरोबर समर्थकांमध्ये आनंदाचे वातवारण आहे. असे असतानाच दुसरीकडे विरोधी पक्षाच्या समर्थकांच्या पदरी निराशाच पडली आहे. त्यातही निकालाचे प्राथमिक कल हाती येण्यास सुरुवात झाल्या झाल्याच भाजपाच्या समर्थकांनी विरोधी पक्षाच्या समर्थकांचे ट्रोलिंग सुरु केले. भाजपा जिंकतंय असं दिसल्यावर अपेक्षेप्रमाणे शेअर बाजारातही उत्साहाचे वातावरण होते. बहुतेक सर्व शेअर्सचे भाव वधारत होते, औषधं बनवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्ससह… काही ट्रोलर्सनी तर चक्क बाजारात तेजीत असलेल्या काही शेअर्सची सांगड सद्यस्थितीशी घातली. या ट्रोलिंगमध्ये भाजपाच्या समर्थकांनी विरोधकांचा मोदींच्या विजयामुळे जळफळाट झाल्याने त्यांनी बरनॉल क्रीम लावावे असा खोचक सल्ला दिला. बरनॉलचं उत्पादन करणाऱ्या मॉरपेन लॅबचाही ट्रेंड सुरू होता. या लाटेवर स्वार होत मोदी विरोधकांना बरनॉल वापरण्याचा सल्ला देणारे अनेक ट्विटस आणि पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाल्या होत्या. मोदी विरोधांकडून बरनॉलची मागणी वाढल्याने कंपनीच्या शेअरचे भाव वाढल्याचा टोला मोदी समर्थकांनी विरोधकांना सोशल नेटवर्किंगवरुन लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरोखरच निकालाच्या दिवशी बरनॉल बनवणाऱ्या डॉ. मॉरपेन लॅब या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याचे दिसले. सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा कंपनीचा शेअर १९.९० रुपयांवर होता. मात्र अवघ्या काही तासांमध्ये तो तब्बल आठ टक्क्यांनी वधारला आणि चर्चेत आला. अंगाला एखाद्या गरम वस्तूचा चटका बसला किंवा भाजल्यास बरनॉल क्रीम लावली जाते. जळत्या जागी बरनॉल लावल्यास त्वचेची आग-आग होत नाही म्हणूनच हे क्रीम प्राथमिक उपचार म्हणून वापरतात. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजेच १९ आणि २० तारखेलाही बरनॉलची इंटरनेटवर चांगलीच चर्चा होती. एग्झिट पोलमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल असे चित्र समोर आल्यानंतर भाजपा समर्थकांनी हे क्रीम वापरावं असा सल्ला विरोधकांना दिला आणि त्यांच्या जखमेवर आणखी मीठ चोळलं. एग्झिट पोलनंतर बरनॉलचा तुटवडा निर्माण होणार असल्याने निकालाच्या दिवशी म्हणजेच २३ तारखेला बरनॉल मिळणार नाही म्हणून मोदी विरोधांनी ते आत्ताच खरेदी करुन ठेवावे असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी सोशल मीडियावर अनेकांनी या शेअरच्या भावात तेजी आल्याचे स्क्रीनशॉट्स शेअर केले होते. अनेकांना हे स्क्रीनशॉट्स खोटे वाटले मात्र खरोखरच मॉरपेन लॅबच्या शेअरची किंमत आठ टक्क्यांनी वाढली होती, त्याचं कारण अर्थातच बाजारातली तेजी होतं.
राफेलमधून बरनॉल फेकले

सर्व विरोधाकांसाठी बरनॉल

मारा बरनॉलचा

लावा थोडं बरं वाटेल

ट्रकभर

बरनॉलवर सबसिडी

स्टॉक संपला

शेअरची किंमत वाढण्यामागील खरे कारण का?

मोदी सरकार पुन्हा बहुमताने सत्तेवर येणार अशा मतमोजणीच्या कलाने हर्षोल्हसित दलाल स्ट्रीटवर गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सेन्सेक्सने पहिल्यांदाच ४० हजारांपुढे मुसंडी मारली. त्यामुळे शेअर मार्केटमधील सर्वच कंपन्यांच्या शेअर्सची किंमत वधारली होती. याचा परिणाम सर्व फार्मा म्हणजेच औषध कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीवरही दिसून आला. म्हणूनच बरनॉल बनवणाऱ्या मॉरपेन लॅबच्या शेअर्सची किंमतही आठ टक्क्यांनी वाढली.

 

मोदी सरकार २०१४ साली सत्तेवर आले त्यावेळी मतमोजणीच्या दिवशी सेन्सेक्सने पहिल्यांदाच २५,०००चे शिखर गाठले होते, यावेळच्या निकालाच्या दिवशी निर्देशांकाने ४०,००० ची अभूतपूर्व पातळी गाठली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Burnol share increased on lok sabha election result day
First published on: 24-05-2019 at 14:22 IST