आदर्श अचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांना ७२ तासांसाठी प्रचारबंदी केली आहे. या काळात नवज्योत सिंग सिद्धू यांना सभा, रोड शो, मुलाखती देता येणार नाहीत.

उद्या २३ एप्रिल सकाळी नऊ वाजल्यापासून ही प्रचार बंदी लागू होणार आहे. बिहारच्या काथिहार जिल्ह्यात बारसोई आणि बारारी येथे निवडणूक प्रचारात केलेल्या वक्तव्या प्रकरणी निवडणूक आयोगाने सिद्धू यांच्यावर ही कारवाई केली आहे.

बिहारमध्ये भाषण करताना सिद्धू यांनी मुस्लिमांना मतविभाजन टाळण्याचा सल्ला दिला होता. निवडणूक आयोगाने त्यांच्या या वक्तव्याचा निषेंध नोंदवला.