News Flash

लातूरच्या साखरपट्टय़ात भाजप नेत्यांच्या सभेला गर्दी

भाजपचे नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी मांजरा पट्टय़ातील गावांमध्ये बुधवारी रात्री प्रचारसभा घेतल्या.

पचे नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी मांजरा पट्टय़ातील गावांमध्ये बुधवारी रात्री प्रचारसभा घेतल्या.

प्रदीप नणंदकर, लातूर

‘करून करून काय करतील, गाळपासाठी ऊसच नेणार नाहीत ना,’ हा संवाद आहे मांजरा पट्टय़ातील लातूर तालुक्यातील तांदुळजा गावचा. मांजरा नदीच्या या पट्टय़ात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष मजबूत झाला होता. मात्र, आता वारे बदलते आहे, असे संवाद या पट्टय़ातील गावांमध्ये ऐकू येत आहे. भाजपचे नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी मांजरा पट्टय़ातील गावांमध्ये बुधवारी रात्री प्रचारसभा घेतल्या. तेव्हा ऊस न नेण्याबाबतची निर्वाणीची भाषा करत लोक भाजपच्या सभांना गर्दी करू लागले आहेत.

लातूर तालुक्यातील काही गावे म्हणजे ‘पंजा’वर एकगठ्ठा मतदान होत असे. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपला मतदान केले जात आहे. प्रचारसभा असणाऱ्या गावांमध्ये जाण्यापूर्वी नेत्यांचे स्वागत केले जात आहे. तांदुळजा या गावात पोहोचण्यापूर्वी संभाजी पाटील यांची गाधवड आणि काटगाव येथे स्वागत करण्यात आले. लोक सांगत होते, ‘जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये आमच्या गावांनी तुमच्या पक्षाला मताधिक्य दिले आहे. लक्ष असू द्या.’ लातूरच्या राजकारणात सहकारी साखर कारखान्यांचा प्रभाव अधिक आहे. बहुतांश सहकारी साखर कारखाने काँग्रेस नेत्यांच्या अधिपत्याखाली आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाना यातील नाते सहजासहजी तुटणारे नसते. तरी देखील या गावांमध्ये भाजपच्या सभांना गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.  सभेपूर्वी फटाके, ‘आगे बढो’च्या घोषणा असा निवडणुकीचा माहोल रंगू लागला आहे. ४० वर्षांत आपल्या कुटुंबाचे प्रश्न देशमुखांनी सोडवले.

पाच वर्षांत आम्ही सामान्य माणसांचे प्रश्न सोडवले, असे निलंगेकरांनी म्हणताच उपस्थितांनी त्याला टाळय़ांनी प्रतिसाद दिला. सहकारी साखर कारखान्यांच्या राजकारणाला छेद देणाऱ्या सभा सध्या लातूरमध्ये होत असून काँग्रेस-भाजपाची दुरंगी लढत असली, तरी वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारालाही प्रतिसाद मिळतो आहे. अहमदपूर, निलंगा येथील प्रकाश आंबेडकरांच्या सभेला गर्दी तर होतीच शिवाय सभा संपल्यानंतर आंबेडकरांना भेटून निवडणूक प्रचारासाठी पैसे देण्यासाठी कार्यकर्ते गर्दी करत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 4:10 am

Web Title: crowd gathered at the meeting of the bjp leaders in the latur
Next Stories
1 बीडमध्ये शिवसंग्रामचा राष्ट्रवादीला पाठिंबा; भाजपला धक्का
2 ‘शिट्टी’ परत मिळवण्याच्या ‘बविआ’च्या प्रयत्नांना खीळ!
3 ऊर्मिला मातोंडकर यांच्या चेहऱ्याकडे बघून उमेदवारी!
Just Now!
X