News Flash

अंमळनेरमध्ये धरणग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

धरणग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर निदर्शनं केली असून त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडेही दाखवले.

(संग्रहित छायाचित्र)

जळगावमधील अंमळनेर येथे प्रचारसभा घेण्यासाठी गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारी धरणग्रस्तांच्या रोषाचा सामना करावा लागला. धरणग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर निदर्शनं केली असून त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडेही दाखवले. या प्रकरणी पोलिसांनी सात ते आठ जणांना ताब्यात घेतले आहे.

अंमळनेर येथे शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेसाठी मुख्यमंत्री पोहोचले असता धरणग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर निदर्शनं केली. गेल्या २० वर्षांपासून पडलसे धरणाचे काम खोळंबले आहे. या प्रकल्पाचे काम मार्गी लावावे, यासाठी धरणग्रस्त आक्रमक असून धरणाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी त्यांची मागणी आहे. या आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी सात ते आठ जणांना ताब्यात घेतले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 1:56 pm

Web Title: dam protesters show black flags to cm devendra fadnavis at jalgaon amalner
Next Stories
1 प्रियांका चतुर्वेदींची काँग्रेसला सोडचिठ्ठी; शिवसेनेत केला प्रवेश
2 साध्वींच्या विधानावर मोदींनी भूमिका स्पष्ट करावी: जितेंद्र आव्हाड
3 साध्वींच्या विधानावर भाजपा प्रवक्ते म्हणतात, ‘निषेधचा प्रश्नच नाही, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार’
Just Now!
X