News Flash

मनसेच्या कार्यकर्त्याला श्रद्धांजली म्हणून धनंजय मुंडेंनी रद्द केली सभा

परळी हे मुंडेंचं होमग्राउंड असल्याने त्यांना ऐकायला मोठ्या प्रमाणावर गर्दीही जमली होती

बीड लोकसभा मतदारसंघातील परळी शहरात गुरुवारी सायंकाळी गणेशपार या नावाजलेल्या भागात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची रात्री आठ वाजता जाहीर सभा होती. गणेशपार भागात सभा घेतली की विजय निश्चितच होतो अशी अनेक पक्षांची धारणा, त्यामुळे येथील सभा ही महत्त्वाची समजली जाते. त्यात परळी हे मुंडेंचं होमग्राउंड असल्याने ते लोकप्रियही आहेत आणि त्यांना ऐकायला मोठ्या प्रमाणावर गर्दीही जमली होती.

जवळपास दोन तास आधीच संध्याकाळी सहा वाजताच सभेला गर्दी झाली होती, मात्र साडे नऊ वाजता मुंडे यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी चक्क व्यासपीठावर येऊन ही सभा रद्द केल्याचे जाहीर करून आश्चर्याचा धक्का दिला. सूत्रसंचालकाच्या हातातला माईक ताब्यात घेत मला माफ करा मी आज येथे भाषण करायला आलेलो नाही, पुन्हा कधीतरी नक्कीच येईन असे त्यांनी सांगितले. तुमच्याशी बोलण्यापेक्षा मला आज एका गोष्टीचे वाईट वाटत आहे की या भागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक सच्चा कार्यकर्ता वैजनाथ दहातोंडे चे काही तासांपूर्वीच दुःखद निधन झाले आहे.

वैजनाथ हा एक तरुण आणि सर्वसामान्यांसाठी तळमळीने काम करणारा माझा चांगला मित्र होता. पक्ष कोणताही असला तरी शहरातील सामाजिक चळवळ जिवंत राहण्यासाठी अशा कार्यकर्त्यांचे मोठे योगदान असते. वैजनाथ आणि त्याचे कुटुंबीय दुःखात असताना मला सभा घेणे योग्य वाटत नाही म्हणून आपण सर्वजण वैजनाथला श्रद्धांजली व वाहू या असे सांगत मुंडेंनी वैजनाथ यांना श्रद्धांजली वाहिली.

श्रद्धांजली वाहून सभा संपल्याचे जाहीर करत सर्वजण आपल्या पुढच्या कार्यक्रमासाठी निघून गेले. धनंजय मुंडे यांच्या या संवेदनशीलतेची परळीकरांमध्ये चांगलीच चर्चा होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 12:23 pm

Web Title: dhananjay munde cancel rally tribute to mns worker
Next Stories
1 ‘शरद पवारांचा राष्ट्रवाद गेला कुठे?, पक्षाचे नाव केवळ जनतेला फसवण्यासाठी’
2 सैन्याच्या कामगिरीचा राजकीय वापर थांबवा; माजी सैन्य प्रमुखांचे राष्ट्रपतींना पत्र
3 राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसमध्येच राहणार; सुजय विखेंचे स्पष्टीकरण
Just Now!
X