News Flash

चिक्की घोटाळ्याच्या पैशांतून शेतकऱ्यांना उसाचे पैसे द्या- धनंजय मुंडे

पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडेंनी टोला लगावला आहे

चिक्की घोटाळ्याच्या पैशांतून शेतकऱ्यांना उसाचे पैसे द्या- धनंजय मुंडे
संग्रहित छायाचित्र

शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देण्यासाठी आईची जमीन कशाला गहाण ठेवता? त्यापेक्षा चिक्की घोटाळ्यातून आलेले पैसे द्या आणि त्यातून शेतकऱ्यांची भरपाई करून द्या असा टोला धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना लगावला आहे. विरोधी पक्षनेता तोडपाणी करणारा असता तर तुमचे घोटाळे बाहेर काढले नसते असेही धनंजय मुंडेंनी सुनावले आहे. हिंगोली या ठिकाणी झालेल्या सभेत ते बोलत होते. हिंगोली मतदारसंघातील उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती.

पंकजा मुंडे यांच्या टीकेला उत्तर देताना धनंजय मुंडे म्हटले की मी मुंडेसाहेबांचा वारस स्वतःला कधीच समजत नाही. जो काय वारसाहक्क सांभाळायचा आहे तो पंकजाताईंनी सांभाळावा. तुमच्या सरकारचे घोटाळे मी बाहेर काढले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात तुम्ही सरकारमध्ये आहात, तुमच्या नेतृत्त्वाखाली चौकशी समिती नेमावीत आणि घोटाळ्यांची चौकशी मी करतो मग दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाईल असेही मुंडे यांनी म्हटले आहे.

जनाची नाही तर मनाची ठेवावी आणि शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा चिक्की खाल्लेले पैसे दिले तर बरं होईल. तुम्ही चिक्कीत 200 कोटी खाल्ले. 110 कोटींच्या फोनमध्ये 70 कोटी खाल्ल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2019 10:14 pm

Web Title: dhananjay munde criticised pankaja munde on chikki scam
Next Stories
1 खोटारड्या मोदींचे तोंड सर्जिकल टेपने बंद करा-ममता बॅनर्जी
2 मागील पाच वर्षात कलाकारांकडून खंडणी मागितली गेली का?-विनोद तावडे
3 अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याची ओरड का?-विनोद तावडे
Just Now!
X