भोपाळमधील काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या प्रचार सभेमध्ये एक विचित्र घटना घडली. भाषणाच्या ओघात त्यांनी उपस्थित जनसमूहाला तुमच्या खात्यात १५ लाख रुपये जमा झाले का? असा प्रश्न केला. ज्यांच्या खात्यात १५ लाख जमा झाले त्यांनी हात वरती उचलावा असे ते म्हणाले. सभेला उपस्थित असलेले लोक नकारार्थी उत्तर देतील असे दिग्विजय यांना वाटले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण गर्दीमध्ये उभ्या असलेल्या एका युवकाने हात वरती उचलला. त्यावेळी दिग्विजय सिंह यांनी त्या युवकाला स्टेजवर बोलावले. तुझ्या बँकेचा अकांऊट नंबर सांग असे त्या युवकाला म्हणाले. स्टेजवर आलेल्या त्या युवकाने माईक हातात घेतला व मोदींनी ‘सर्जिकल स्ट्राइक केला. दहशतवादी मारले’ असे म्हणाला.

त्यानंतर काँग्रेसच्या मंचावरील अन्य नेत्यांनी त्या युवकाला खाली उतरवले. त्यावेळी चिडलेल्या स्वरात दिग्विजय यांनी तुझ्या खात्यात १५ लाख जमा झाले का? तुला नोकरी मिळाली का? असे प्रश्न त्याला केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Digvijaya singh asks a youth in the crowd did you get rs 15 lakhs in your account
First published on: 22-04-2019 at 19:24 IST