News Flash

दिलीप वळसे-पाटलांच्या स्वीय सहाय्यकाला बेदम मारहाण

सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास आंबेगावमधील मेंगडेवाडी येथे ही घटना घडली, यामध्ये ते जखमी झाले आहेत.

आंबेगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक काळूदास दांगट यांच्यावर काल मध्यरात्री हल्ला झाला.

माजी विधानसभा अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक काळूदास दांगट आणि त्यांच्या पत्नीवर हल्ला झाल्याचे वृत्त आहे. सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास आंबेगावमधील मेंगडेवाडी येथे ही घटना घडली. यामध्ये दांगट जखमी झाले आहेत.

हा हल्ला शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी घडवून आणल्याचा आरोप दिलीप वळसे-पाटील यांनी केला आहे. रात्री दीडच्या सुमारास दांगट यांना काही लोकांनी घराबाहेर बोलावले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्राणघातक हल्ला खपवून घेतला जाणार नाही असा इशारा वळसे पाटील यांनी दिला आहे.

शिवसैनिकांच्या या भ्याड हल्ल्याचा आणि हीन वृत्तीचा आपण निषेध करतो असे दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीटकरुन म्हटले आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी काल आंबेगाव येथे मतदान पार पडले. त्यानंतर ही घटना घडल्याने राजकीय वादातून हा प्रकार घडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 5:01 pm

Web Title: dilip walse patils personal assistant has assaulted at midnight on monday
Next Stories
1 प्रियंका गांधींना सांगितलं वाराणसीतून निवडणूक न लढण्याचं कारण
2 बायकोच्या शाळेच्या पार्टीत नवऱ्याचा गोळीबार, पत्नी जखमी
3 तीन दिवसांत आढळले दोन मुलींचे मृतदेह, तेलंगणात सीरिअल किलिंग ?
Just Now!
X