News Flash

भाजपाचा प्रचार करणाऱ्या कुत्र्याला घेतले ताब्यात, महाराष्ट्रातील घटना

एका कुत्र्याच्या शरीरावर भाजपाच्या प्रचाराचे स्टीकर्स आढळल्याने या कुत्र्याला आणि त्याच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

संग्रहित छायाचित्र

एका कुत्र्याच्या शरीरावर भाजपाच्या प्रचाराचे स्टीकर्स आढळल्याने या कुत्र्याला आणि त्याच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार लोकसभा मतदारसंघात एका कुत्र्याच्या शरीरावर भाजपाच्या प्रचाराचे स्टीकर्स चिकटवण्यात आले होते. नंदूरबारमध्ये सोमवारी मतदान पार पडले.

नवनाथ नगरमधील रहिवाशी एकनाथ मोतीराम चौधरी (६५) सोमवारी दुपारी अंधारे रुग्णालयाजवळ या कुत्र्यासोबत फिरत होते. भाजपाचे निवडणूक चिन्ह आणि ‘मोदी लाओ, देश बचाओ’ अशा संदेशाचे स्टीकर्स त्या कुत्र्याच्या शरीरावर चिकटवलेले होते.

मतदान सुरु असताना कुत्र्याच्या संपूर्ण शरीरावर भाजपाच्या प्रचाराचे स्टीकर्स चिकटवण्यात आले होते.  हा कुत्रा त्याच्या मालकासोबत प्रचाराचे स्टीकर्स लावू फिरत असल्याची तक्रार पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी आयपीसीच्या कलम १७१ (अ) अंतर्गत चौधरी यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांनी महापालिकेला कुत्र्याचा ताब्यात घेण्यास सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 2:26 pm

Web Title: dog detained for bjp stickers on body
Next Stories
1 पाकिस्तानात बुरहान वानीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट, इम्रान खान यांच्या पक्षातील नेता मुख्य भुमिकेत
2 नरेंद्र मोदींची उमेदवारी रद्द करा, ‘तृणमूल’चे निवडणूक आयोगाला पत्र
3 व्हेल मासा बनला रशियाचे अस्त्र, नॉर्वे विरोधात हेरगिरीसाठी उपयोग?
Just Now!
X