01 October 2020

News Flash

प्रचाराचे रंग-ढंग : एकनाथ गायकवाड यांचा जाहीर, चौकसभांवर भर

गायकवाड यांनी आतापर्यंत माहिम, दादर, धारावी, माटुंगा, नायगाव, माहिम, चेंबूर, सायन कोळीवाडा पिंजून काढला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या वेळी शिवसेनेने बाजी मारलेल्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेना-काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई आहे. काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी प्रचारफेरी, पदयात्राबरोबरच मोठय़ा प्रमाणात जाहीर सभा, चौकसभांवरही भर देत शिवसेनेला टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे. मुख्य म्हणजे त्यांना मनसेचाही पाठिंबा मिळत असून मनसे कार्यकर्ते गायकवाड यांच्यासमवेत पदयात्रा, चौकसभांमध्ये सहभागी होताना दिसून येत आहेत.

गायकवाड यांनी आतापर्यंत माहिम, दादर, धारावी, माटुंगा, नायगाव, माहिम, चेंबूर, सायन कोळीवाडा पिंजून काढला आहे. या ठिकाणी त्यांनी मोठय़ा प्रमाणात जाहीर सभा व चौकसभा घेतल्या आहेत. सकाळी १० ते रात्री १० असा प्रचाराचा दिनक्रम असतो. गुरुवारीही गायकवाड यांनी चेंबूर, सायन कोळीवाडा भागांत पदयात्रा व जाहीर सभा, चौकसभा घेतल्या. या वेळी मोठय़ा संख्येने कार्यकर्तेही सोबत होते. गल्लोगल्ली प्रचार करताना त्यांचे हारतुरे घालून स्वागत करण्यात आले. वाजतगाजत मिरवणूक काढताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून विजयाच्या घोषणाही दिल्या जात होत्या. गायकवाड यांच्याकडून काढण्यात येणाऱ्या प्रचारयात्रांमध्ये मनसेचेही कार्यकर्ते सामील होताना दिसतात.

दक्षिण मध्य मुंबईत विजयश्री पुन्हा खेचून आणण्यासाठी गायकवाड यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे माजी मंत्री दक्षिण मुंबईत दाखल होत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सभा येथे झाल्या.

सध्या सायंकाळच्या सुमारास गायकवाड प्रचारफेऱ्या काढत आहेत. गुरुवारी प्रतीक्षा नगर, टाटा कंपाऊंड, मोतीलाल नेहरू नगर, खडी मशीन या ठिकाणी गायकवाड यांनी फेऱ्या काढल्या. या फेऱ्यांची जबाबदारी त्या त्या ठिकाणच्या नगरसेवकांकडे व जिल्हाध्यक्षांकडे असते. मात्र शिवसेना, भाजपसारखा नियोजनपूर्ण प्रचार होताना दिसत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 12:11 am

Web Title: eknath gaikwads meeting at all
Next Stories
1 मी उमेदवार : ईशान्य मुंबई
2 रेल्वेत पैसे उकळणारे ७३ हजार तृतीयपंथीय अटकेत
3 मावळ्यांच सरकार पाहिजे की मावळला ‘गोळीबार’ करणाऱ्यांचं – उद्धव ठाकरे
Just Now!
X