निवडणुकांच्या वेळी, प्रचाराच्या दरम्यान अनेक दुढ्ढाचार्य आपली विशिष्ट मानसिकता घेऊन काही आकडे आणि गृहितकं मांडत होते. मात्र मतदारांच्या केमिस्ट्रीने या सगळ्यावर मात केली आणि निवडणुकीचे अभूतपूर्व निकाल समोर आले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे स्वतःला राजकीय तज्ज्ञांचे अंदाज या निवडणुकीला चुकले. आता यातून या दुढ्ढाचार्यांनी धडा घ्यावा त्यांनी हे समजून घ्यावं की ते मांडत असलेली आकडेवारी आणि गृहितकांचे अंदाज मागे पडत चालले आहेत. त्या सगळ्या तज्ज्ञांना माझं हे सांगणं आहे की लोकांच्या मनातला आवाज ऐकायला शिका. काशीमध्ये मतदारांचे आभार मानण्यासाठी मोदी आले होते त्यांनी त्यावेळी त्यांनी हे मनोगत व्यक्त केले.

भाजपाने व्होट बँकेचे राजकारण केले नाही. सबका साथ सबका विकास हा नारा कायम ठेवला. विकासासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करणार आहोतच असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. गरीबांना हक्काची घरं मिळणारच, त्यासाठी त्यांना एवढी वाट बघावी लागली हे दुर्दैव आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. आपल्या देशात जे महापुरूष होऊन गेले त्यांनी या देशाला खूप काही दिलं आहे. आपल्या देशाला त्यांच्या विचारांची परंपरा आहे. आपली संस्कृती कायम ठेवून सध्याच्या परिस्थितीला तोंड द्यायचं आहे. या दोन्हीचा समतोल राखत आम्ही पुढे चाललो आहोत. कुंभ मेळ्याचा उपयोग कायम बदनामीसाठी केला गेला, मात्र योगी आदित्यनाथ यांनी याची व्याख्या बदलली. ते ज्या प्रकारे विचार करत आहेत त्याची गरज होती.

भाजपाला प्रभू रामचंद्र जेवढे महत्त्वाचे वाटतात तेवढाच वैज्ञानिक दृष्टीकोन महत्त्वाचा वाटतो. संस्कृती आणि विज्ञान या दोन्हीचा समतोल राखत पुढे जायचं आहे. अयोध्येत दिवळी साजरी करण्यापासून इतके दिवस कोणी रोखलं होतं? असाही प्रश्न मोदींनी विचारला. सगळ्या जुन्या वस्तुंना तिलांजली देऊनच पुढे चालले पाहिजे असं काही नाही. आपण जगात ११ व्या क्रमांकाची अर्थव्यस्था होतो आता आपण सहाव्या क्रमांकावर आलो आहोत आता आपल्याला प्रयत्न तिसऱ्या क्रमांकावर जाण्यासाठी करायचा आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. आज भाजपाच्या मतांचा टक्का वाढतो आहे. सर्वजनहिताय, सर्वजनसुखाय हे भाजपाचे धोरण आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.