20 October 2019

News Flash

मुंबईच्या सायन भागातून ११ लाख ८५ हजाराची रोकड जप्त

मुंबई सायन भागातून काल रात्री निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने ११ लाख ८५ हजार रुपयांची संशयित रक्कम पकडली.

मुंबई सायन भागातून काल रात्री निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने ११ लाख ८५ हजार रुपयांची संशयित रक्कम पकडली. याबाबत अधिक तपास सुरु आहे.

बुधवार रात्री सायन कोळीवाडा परिसरात संजय नारायन वारंग यांच्या फिरत्या तपासणी पथकाने सायन हॉस्पीटल जवळील सिग्नलवर पाहणी करत असताना, त्यांनी लाल रंगाच्या रेनॉल्ट डस्टर या मोटार कारची (एम.एच.47 ए.बी.6559) तपासणी केली.

गाडीमध्ये दयाराम हरीराम जैस्वाल, अजितकुमार बलराज शाह व अनुराग कुमार शाह हे तीन इसम होते. त्याच्याकडे ११ लाख ८५ हजार रुपये रक्कम आढळून आली. याबाबत आयकर विभागाला कळविण्यात आले असून आयकर विभागाचे उप आयुक्त अधिक चौकशी करीत आहेत. अशी माहिती मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पवार यांनी दिली.

First Published on April 18, 2019 5:28 pm

Web Title: election commission dept seize cash from mumbai sion area