24 January 2020

News Flash

तिसऱ्या टप्प्यात निम्म्यांपेक्षा जास्त जागा भाजपकडे

गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत

गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत

तिसऱ्या टप्प्यात येत्या मंगळवारी देशातील ११५ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. यापैकी निम्म्यांपेक्षा जास्त म्हणजे ६२ मतदारसंघांत भाजपचे सध्या खासदार आहेत. गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकावर भाजपची तर केरळवर काँग्रेसची मदार आहे.

लोकसभेच्या १८८ मतदारसंघांत दोन टप्प्यांमध्ये मतदान पार पडले. तिसऱ्या टप्प्यात गुजरात (२६) आणि केरळ (२०) एकाच वेळी सर्व मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. याशिवाय महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, आसाम, छत्तीसगड, गोवा, उत्तर प्रदेश, ओडिशा आदी राज्यांमध्ये मतदान होत आहे.

भाजपची सारी मदार ही गुजरातवर आहे. गेल्या वेळी गुजरातमधील सर्व २६ जागा भाजपने जिंकल्या होत्या. यंदाही गुजरातमध्ये गेल्या यशाची पुनरावृत्ती करण्याची भाजपचा प्रयत्न आहे. गेल्या वेळी मोदी हे बडोदा मतदारसंघातून लढले होते. यंदा लालकृष्ण अडवाणी यांना डावलून भाजप अध्यक्ष अमित शहा हे गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा टक्कर दिली होती. याच धर्तीवर भाजपला रोखण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. सौराष्ट्रात काँग्रेसला अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाले होते. यातूनच सौराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघांवर काँग्रेसने लक्ष केंद्रित केले आहे. अगदी विरोधी पक्षनेते परेश धमानी यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे.

कर्नाटकातील १४ पैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजप आणि काँग्रेसचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील १४ पैकी १० जागा गेल्या वेळी युतीने जिंकल्या होत्या. यंदा युतीला धक्का देण्याचा काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. केरळातील वायनाड मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे रिंगणात आहेत. केरळमध्ये मोठे यश मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. केरळात खाते उघडवण्यावर भाजपने भर दिला आहे. डावे पक्षही तयारीशी उतरले आहेत.

तिसऱ्या फेरीतील मतदारसंघ आणि पक्षीय बलाबल

 • आसाम (४)/ भाजप-१, युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट-२, अपक्ष-१
 • बिहार (५)/ भाजप-१, काँग्रेस-१, राष्ट्रीय जनता दल-२, लोकजनशक्ती-१
 • छत्तीसगढ (७)/ भाजप- ६, काँग्रेस-१
 • दादरा, नगर-हवेली (१)/ भाजप-१
 • दमण-दीव (१)/भाजप १
 • गोवा (२)/ भाजप-२
 • गुजरात (२६)/ भाजप-२६
 • जम्मू-काश्मीर (१)/ पीडीपी-१
 • कर्नाटक (१४)/ भाजप-१०, काँग्रेस- ४
 • केरळ (२०)/ माकप-५, भाकप-१, काँग्रेस-८, केरळ काँग्रेस एम- १, मुस्लिम लिग-२, आरएसपी-१, अपक्ष-२
 • महाराष्ट्र (१४)/ भाजप-६, शिवसेना-३, राष्ट्रवादी काँग्रेस-४, स्वाभिमानी शेतकरी-१
 • ओडिशा (६)/ बीजेडी-६
 • उत्तर प्रदेश (१०)/भाजप-७, सप-३

First Published on April 22, 2019 1:06 am

Web Title: election in india 3
Next Stories
1 सांगलीचे नेतृत्व कोणाकडे याचा निर्णय घेणारी निवडणूक
2 शिवसेनेसमोर देवरांचे कडवे आव्हान
3 देशात नीतिमत्तेचं राजकारण संपलंय – प्रकाश आंबेडकर
Just Now!
X