20 June 2019

News Flash

अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान

अखेरच्या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात ९१८ उमेदवार आहेत.

संग्रहित छायाचित्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघासह ५९ मतदारसंघांत लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या म्हणजे सातव्या टप्प्यातील मतदान आज, रविवारी होत आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड या राज्यांसह चंडीगड येथे अखेरच्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

अखेरच्या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात ९१८ उमेदवार आहेत. त्यांचे भवितव्य १० कोटींहून अधिक मतदार ठरवणार आहेत. या टप्प्यासाठी निवडणूक आयोगाने १ लाख १२ हजार मतदान केंद्रे उभारली आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या या टप्प्यातील मतदानासोबतच पणजी आणि तमिळनाडूतील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. यापूर्वीच्या सहा टप्प्यांमध्ये सरासरी ६६.८८ टक्के मतदानाची नोंद झाली. मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे.

रविवारी मतदान होत असलेल्या टप्प्यातील पक्षनिहाय संख्याबळ

  • बिहार- ८ : भाजप ५, जनता दल (सं) १, राष्ट्रीय लोक समता पक्ष २
  • चंडीगड -१ : भाजप १
  • हिमाचल प्रदेश -४ : भाजप ४
  • झारखंड- ३: झारखंड मुक्ती मोर्चा २, भाजप १
  • मध्य प्रदेश – ८ : भाजप ७, काँग्रेस १
  • पंजाब- १३ : शिरोमणी अकाली दल ४, काँग्रेस ४, आप ४ , भाजप १
  • उत्तर प्रदेश – १३: भाजप ११, सप १, अपना दल १
  • पश्चिम बंगाल -९ : तृणमूल काँग्रेस ९

वाराणसीकडे लक्ष

उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघातील मतदानाकडे सर्वाचे लक्ष आहे. तेथे  पंतप्रधान मोदी यांच्यासह अन्य २५ उमेदवार रिंगणात आहेत. मोदी यांची प्रमुख लढत काँग्रेसचे अजय राय आणि सप-बसपच्या उमेदवार शालिनी यादव यांच्याशी होणार आहे.

First Published on May 19, 2019 12:18 am

Web Title: election in india 5