29 September 2020

News Flash

राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड, सभांना होणार उशीर

राहुल गांधी यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे

संग्रहित छायाचित्र

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे त्यांना पुन्हा दिल्लीला परतावं लागलं आहे. राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार करण्यासाठी पाटणा येथे जात असताना त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे राहुल गांधी यांच्या सभांना उशीर होणार आहे. राहुल गांधी यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘आज पाटणा येथे जात असताना आमच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे आम्हाला दिल्लीला परतावं लागलं आहे. बिहारमधील समस्तीपूर, ओडिसामधील बालासोर आणि महाराष्ट्रामधील संगमनेर येथील सभांना यामुळे उशीर होईल’. राहुल गांधी यांनी यासोबत माफीदेखील मागितली आहे. ट्विटसोबत विमानातील व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये वैमानिक कॉकपीटमध्ये बसलेले दिसत असून राहुल गांधीही दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 11:02 am

Web Title: engine trouble on rahul gandhis flight to patna
Next Stories
1 वाराणसीतील सभेत मोदींनी का दिला भारत- पाक सामन्याचा दाखला, जाणून घ्या
2 …म्हणून ‘पेप्सीको’ने भारतीय शेतकऱ्यांविरोधात केला १ कोटी ५ लाखांचा दावा
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X