19 January 2020

News Flash

Exit Poll 2019: उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला हादरा, ‘बुआ-भतीजा’ची मुसंडी ?

एबीपी- नेल्सनच्या अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाप्रणित एनडीएला २२, काँग्रेसला २ तर सपा- बसपा महाआघाडीला ५६ जागांवर विजय मिळण्याची चिन्हे आहेत.

संग्रहित छायाचित्र

पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील ८० पैकी ७३ जागांवर बाजी मारणाऱ्या भाजपाला यंदाच्या निवडणुकीत फटका बसण्याची चिन्हे आहेत. एक्झिट पोलमधील अंदाजानुसार भाजपाला यंदाच्या निवडणुकीत २०१४ पेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता आहे.

२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयात उत्तर प्रदेशचे योगदान मोलाचे होते. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या ८० जागा आहेत. यातील भाजपाला ७१ तर मित्रपक्षांना दोन अशा एकूण ७३ जागा एनडीएला मिळाल्या होत्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपाला या राज्यात मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत. यंदाच्या निवडणुकीत मायावती आणि अखिलेश यादव यांनी महाआघाडी केली आहे आणि याचा फटका भाजपाला बसला आहे. एबीपी- नेल्सनच्या अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाप्रणित एनडीएला २२, काँग्रेसला २ तर सपा- बसपा महाआघाडीला ५६ जागांवर विजय मिळण्याची चिन्हे आहेत.

वाचा सविस्तर: केंद्रात कोणाची सत्ता येणार, एक्झिट पोल काय सांगतात ?

टाइम्स नाऊ- व्हीएमआरच्या अंदाजानुसार भाजपाला ५८, सपा- बसपा २० आणि यूपीएला २ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर सी व्होटरच्या अंदाजानुसार सपा- बसपा महाआघाडीला ४०, एनडीएला ३८, यूपीएला २ जागांवर मिळण्याची शक्यता आहे.

वाचा सविस्तर: Exit Poll मधील अंदाज काय, महाराष्ट्रात महायुती की आघाडी ?

तर इंडिया टुडे अॅक्सिस My Voter च्या एक्झिट पोलमध्ये भाजपाचे किरकोळ नुकसान होणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाप्रणित एनडीएला ६२- ६८, यूपीएला १ ते २, सपा- बसपा महाआघाडीला १० ते १६ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.

First Published on May 19, 2019 8:46 pm

Web Title: exit poll 2019 uttar pradesh setback to bjp sp bsp alliance congress
Next Stories
1 Exit Poll 2019 : NDA पार करणार ३०० चा आकडा
2 Maharashtra Lok Sabha Exit Poll : वंचित बहुजन आघाडी फेल होणार?
3 अनेक दिग्गज नेत्यांनी थकवलं सरकारी बंगल्यांचं भाडं
Just Now!
X