20 November 2019

News Flash

Exit poll 2019: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससाठी धोक्याची घंटा?, भाजपाला ‘अच्छे दिन’

पश्चिम बंगालमध्ये दोन आकडी संख्या गाठून तृणमूल काँग्रेससमोर आव्हान निर्माण करण्याचे मनसुबे भाजपाने रचले होते. 

२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी तब्बल ३४ जागांवर विजय मिळवला होता. तर डाव्या पक्षांनी दोन, भाजपाने दोन आणि काँग्रेसला चार जागांवर विजय मिळवला होता.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने आव्हान निर्माण केल्याचे एक्झिट पोलमधून समोर आले आहे. ‘टूडेज चाणक्य’ च्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपाला १८ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर तृणमूल काँग्रेसला २३ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांना खातेही उघडता येणार नाही, असा अंदाज असून काँग्रेसला एका जागेवर विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

२०१४ मधील परिस्थिती काय होती?
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी तब्बल ३४ जागांवर विजय मिळवला होता. तर डाव्या पक्षांनी दोन, भाजपाने दोन आणि काँग्रेसला चार जागांवर विजय मिळवला होता. २००९ मधील लोकसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचे १७ खासदार होते. २०१४ मध्ये पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांच्या खासदारांची संख्या २ वर आली होती. त्यामुळे २०१९ मधील निवडणूक डाव्या पक्षांसाठी अस्तित्वाचा प्रश्न आहे. तर पश्चिम बंगालमध्ये दोन आकडी संख्या गाठून तृणमूल काँग्रेससमोर आव्हान निर्माण करण्याचे मनसुबे भाजपाने रचले होते.

वाचा सविस्तर: देशात ‘फिर एक बार मोदी सरकार’?

वाचा सविस्तर: राज्यात महायुतीचीच बाजी?

एक्झिट पोलचा अंदाज काय ?
> टूडेज चाणक्य: तृणमूल काँग्रेस – २३, भाजपा – १८, डावे पक्ष- ०, काँग्रेस – १

> इंडिया टुडे – अॅक्सिस My India: तृणमूल काँग्रेस – १९ ते २२, भाजपा- १९ ते २३, डावे पक्ष- ०, अन्य – १

> टाइम्स नाऊ- व्हीएमआर: तृणमूल काँग्रेस – २५, भाजपाप्रणित एनडीए- १५, डावे पक्ष – ०, काँग्रेसप्रणित यूपीए- २

> सी व्होटर – तृणमूल काँग्रेस – २९, भाजपाप्रणित एनडीए- ११, डावे पक्ष – ०, काँग्रेसप्रणित यूपीए- २

> एबीपी- नेल्सन: तृणमूल काँग्रेस – २४, भाजपाप्रणित एनडीए- १६, डावे पक्ष – ०, काँग्रेसप्रणित यूपीए- २

First Published on May 19, 2019 9:43 pm

Web Title: exit poll 2019 west bengal tmc bjp mamata banerjee narendra modi amit shah left parties congress
Just Now!
X