20 November 2019

News Flash

Exit Poll: राज्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद वाढणार?

कल जरी महायुतीच्या विजयाच्या बाजूने असले तरी यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचे चित्र आहे.

(संग्रहित छायाचित्र)

लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांचे मतदान पार पाडले आहे. त्यानंतर राज्यातील एकूण ४८ जागांबाबतच्या मतदानोत्तर चाचण्यांचे कलही रविवारी जाहीर झाले. हे कल जरी महायुतीच्या विजयाच्या बाजूने असले तरी यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचे चित्र आहे.

विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेनुसार, गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात यंदा ५ जागांची भर पडेल असा अंदाज आहे. गेल्या २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला राज्यात ४ जागा मिळाल्या होत्या त्यात यंदा पाच जागांची वाढ होऊन त्यांना ९ होतील असा अंदाज आहे. त्यामुळे सहाजिकच राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढेल.

दरम्यान, महाआघाडीचा भाग असलेल्या राष्ट्रवादीचा मित्रपक्ष काँग्रेसची ताकद किंचित वाढणार आहे. कारण, गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या पारड्यात २ जागा होत्या त्यात वाढ होऊन त्या ४ होण्याची शक्यता आहे. एकूणच आघाडीतील या दोन्ही प्रमुख पक्षांच्या जागांमध्ये काहीशी वाढ होणार असल्याने दुसरीकडे भाजपा-शिवसेनेच्या जागांमध्ये घट होणार आहे.

वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळणार नाही असा अंदाज एक्झिट पोल्सने वर्तवला आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जर जागा वाढणार असतील तर शिवसेना-भाजपाच्या जागा नक्कीच कमी होणार आहेत. यामध्ये शिवसेनेला एका जागेने पिछाडीवर जावे लागू शकते. शिवसेनेने मागच्या निवडणुकीत १८ जागा जिंकल्या होत्या, यंदा त्या १७ होण्याची शक्यता आहे. तर भाजपाने गेल्या निवडणुकीत २४ जागा जिंकल्या होत्या त्या यंदा १७ इतक्या राहण्याची शक्यता एक्झिट पोल्सने वर्तवली आहे.

First Published on May 19, 2019 9:43 pm

Web Title: exit poll ncps strength will increase in the state than congress
Just Now!
X