19 January 2020

News Flash

Fact Check: पंतप्रधान मोदी खरचं मौलानांच्या पाया पडले?

मोदी मौलानांच्या पाया पडत असल्याचा दावा करणारा फोटो व्हायरल

व्हायरल पोस्ट

निवडणुकांचा प्रचार संपून आता निकालाकडे सर्वांचे लक्ष्य लागलेले आहे. असे असले तरी सोशल नेटवर्किंगवर अजूनही वेगवेगळ्या पक्षांचे समर्थक विरोधी पक्षाच्या नेत्यांवर टिका करणाऱ्या पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. असाच एक फोटो सोशल नेटवर्किंगवर सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोसोबतच्या कॅप्शननुसार मोदी प्रचारसभेदरम्यान मौलानांच्या पाया पडल्याचा दावा केला जात आहे. मात्र ही पोस्ट खरी आहे की खोटी यावरुन वाद सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर फॅक्ट्स क्रोसेन्डो या वेबसाईटने या फोटोमागील सत्यता काय आहे हे तपासून पाहिले आहे. चला तर जाणून घेऊयात या व्हायरल फोटो आणि त्याबरोबर करण्यात आलेल्या दाव्याबद्दलची सत्यता…

काय आहे पोस्ट:

९ मे २०१९ रोजी फेसबुकवर ईआर अजय यादव नावाच्या फेसबुक पेजवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरव्या रंगाची टोपी घातलेल्या एका वयस्कर व्यक्तीच्या पाया पडतानाचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टच्या डिस्क्रीप्शनमध्ये त्याने हा फोटो कर्नाटक निवडणुकांच्या वेळेचा असल्याचे म्हटले आहे. ‘०९/०५/१८ कर्नाटक निवडणुकी’मध्ये भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींने मौलानांसमोर गुडघे टेकवले,’ अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे. कर्नाटकमधील प्रचारादरम्यान मुसलीम मतांसाठी मोदींनी मौलानांचे पाय धरल्याचा दावा या पोस्टमध्ये केला आहे. हा फोटो ३५ हजारहून अधिक जणांनी शेअर केला आहे.

सत्य काय?

मोदींचा हा फोटो गुगलवरुन रिव्हर्स इमेज सर्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शोधल्यास हा फोटो मोदींनेच ट्विट केल्याचे दिसते. पंतप्रधानांनी ६ फेब्रुवारी २०१७ ला आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन हा फोटो ट्विट केला. हाच फोटो व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये वापरण्यात आला आहे. हा फोटो पोस्ट करताना मोदींनी लिहिले आहे, ‘सुभाषचंद्र बोस यांचे जवळचे सहकारी कर्नल निझामुद्दीन यांना नमन. मी त्यांची भेट घेतली होती तो दिवस आठवला आहे. त्यांच्या मृत्यूने मला दु:ख झाले आहे.’

या ट्विटबरोबरच मोदींचा हा फोटो ‘आऊट लूक इंडिया’च्या फोटोगॅलरीमध्येही दिसतो. ‘पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये एका प्रचारसभेमध्ये स्वातंत्र्य सैनिक असणाऱ्या निझामुद्दीन यांचे आशिर्वाद घेतले,’ अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे. या फोटोचे श्रेय प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच ‘पीटीआय’ला देण्यात आले आहे. म्हणजेच हा फोटो २०१४ च्या निवडणुक प्रचारादरम्यान काढण्यात आला असल्याचे स्पष्ट होते.

याच फोटोसंदर्भात इंटरनेटवर आणखीन सर्च केले असता ‘फर्स्टपोस्ट डॉटकॉम’वर मोदींचा हा फोटो ९ मे २०१९ रोजी अपलोड करण्यात आला आहे. ही बातमी तुम्ही येथे वाचू शकता

या शिवाय ‘झी न्यूज’ने ६ फेब्रुवारी २०१६ रोजी प्रकाशित केलेल्या निझामुद्दीन यांच्या निधनाच्या बातमीमध्येही हा फोटो वापरण्यात आला आहे. खाली पाहा त्या बातमीचा स्क्रीनशॉर्ट.

या बातमीमध्येही मोदींनी २०१४ च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निझामुद्दीन यांचे आशिर्वाद घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे.

‘द मेट्रो पोस्ट’च्या वृत्तामध्येही हा फोटो वापरण्यात आला असून तुम्ही यासंदर्भातील लेख येथे वाचू शकता

हे सर्व फोटो आणि सापडलेल्या संदर्भांवरुन ‘०९/०५/१८ कर्नाटक निवडणुकी’मध्ये भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींने मौलानांसमोर गुडघे टेकवले,’ अशा कॅप्शनसहीत व्हायरल होत असणारा हा फोटो जरी खरा असला तरी त्यासोबतची माहिती चुकीची असल्याचे सिद्ध होत आहे. हा फोटो पंतप्रधान होण्याआधी मोदींने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुभाषचंद्र बोस यांच्या गाडीचे चालक असणाऱ्या निझामुद्दीन यांचे आशिर्वाद घेतले तेव्हा काढण्यात आल्याचे सिद्ध होत आहे.

First Published on May 22, 2019 4:20 pm

Web Title: fact check did narendra modi touch feet of maulana during karnataka polls
Next Stories
1 टॉयलेट सीटवर बसलेला ट्रम्प यांचा रोबो, ‘त्या’ वक्तव्यांवरुन क्रिएटीव्ह टिका
2 ..अन् उन्हापासून वाचण्यासाठी महिलेनं कारला चक्क शेणाने सारवले
3 ध्यानावरुन ट्विंकल खन्नाने घेतली पंतप्रधान मोदींची फिरकी
Just Now!
X