उस्मानाबाद मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्याने मानहाही सहन करावी लागली. चार एकर जमिनिचे ओमराजे निंबाळकर आणि विजय दंडनाईक या दोघांनी फसवणुकीतून केलेले गहाणखत यामुळे कुटुंबाचे हाल झाले आहेत. या परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट लिहून कसबे तडवळे गावातल्या दिलीप ढवळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. दिलीप ढवळे 59 वर्षांचे होते. शेतातल्या झाडाला गळफास लावून घेत त्यांनी आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये ढवळे यांनी उद्धव ठाकरेंच्या नावाचाही उल्लेख केला आहे.

दिलीप ढवळे यांचा मृतदेह झाडावरून खाली उतरवण्यात आल्यानंतर पोलिसांना त्यांच्या खिशात ढोकी पोलीस निरीक्षकाच्या नावे लिहिलेली चिठ्ठी आणि मतदारांना आवाहन करणारे पत्र सापडले आहे. ढवळे यांनी सुसाईड नोटमध्ये ओमराजे निंबाळकर, वसंतदादा बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. या दोघांनी जी फसवणूक केली त्याचमुळे आत्महत्येची वेळ आल्याचे ढवळे यांनी चिठ्ठीत म्हटले आहे.

young man committed suicide as he did not want to marry
खळबळजनक! लग्न करायचं नसल्याने नवरदेवाने केली आत्महत्या; आत्महत्येपूर्वी मामाला…
Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात

या दोघांनी चार एकर जमिनीवर बोजा चढविण्यास भाग पाडले. आपल्या नावे घेतलेल्या कर्जाची सर्व रक्कम तेरणा कारखान्यासाठी वापरण्यात आली. हमी देवूनही परतफेड न केल्यामुळे जमिनीचा तीनवेळा लिलाव पुकारला गेला. त्यातून गावात मानहानी झाली आहे. सततचा दुष्काळ आणि यांनी केलेली फसवणूक यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे.

दिलीप ढवळे यांच्यासारखेच फसवणुकीला बळी पडलेले श्रीमंत तांबोरे हे शेतकरीही मुंबईत उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले होते. मात्र भेट होऊ शकली नाही, उद्धव ठाकरेंची भेट झाली असती तर काहीतरी मार्ग निघाला असता आणि ढवळेंनी जे पाऊल उचललं ते त्यांनी उचललं नसतं अशी खंत तांबोरे यांनी व्यक्त केली. एवढंच नाही तर उद्या आमच्यावरही अशीच वेळ येणार आहे जमीन विकून कर्ज फेडण्याची वेळ येणार आहे. अन्यथा आमच्यासमोरही आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही असे तांबोरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान कसबे तडवळे येथील शेतकर्‍याने फसवणुकीतून आत्महत्या केली असल्याची माहिती प्राप्त होताच कर्मचार्‍यांना पंचनामा करण्यासाठी पाठवले. त्यांनी घटनास्थळावरून मिळालेल्या सर्व गोष्टी साक्षीदारांच्या समक्ष ताब्यात घेतल्या आहेत. कुटुंबीयांचा जबाब नोंदवून प्रकरणाची खातरजमा केली जाईल. त्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. जी. वेव्हळ यांनी सांगितले.