तामिळनाडूमध्ये सहा एप्रिल रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष आणि अपक्ष उमेदवार आपले निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध करत आहेत. अनेक जाहिरनाम्यांमध्ये लोककल्याणासंदर्भातील योजनांचा उल्लेख आहे. मात्र सध्या तामिळनाडूमध्ये सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या जाहीरनाम्यामध्ये एका उमेदवाराने अगदी आयफोन, हेलिकॉप्टर इतकच काय तर चंद्रावर सहल नेण्याचंही आश्वासन दिलं आहे.

दक्षिण मदुराई मतदारसंघामधून निवडणुकीच्या रिंगात उतरलेल्या सर्वनान या ३४ वर्षीय उमेदवाराचा जाहीरनाम सध्या प्रचंड चर्चेत आहे. सर्वनानने आपल्या जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक घरात एक आयफोन, गाडी, हेलिकॉप्टर, रोबोट होडी आणि घरात वापराच्या अनेक वस्तू देण्याचं आश्वासन दिलं आहे. आपल्या जाहीरनाम्यातील सर्व गोष्टी खऱ्या असल्याचं सर्वनान सांगतो. मी जिंकल्यास मतदारसंघामधील प्रत्येक घरात एक आयफोन, गाडी, हेलिकॉप्टर, होडी, रोबोट तर देईलच पण प्रत्येक घरातील एका व्यक्तीच्या नावे तीन मजल्याचे घरही बांधून देईन. या घराच्या गच्चीवर स्विमिंग पूल असेल, असा दावा सर्वनानने केला आहे. तसेच तरुणांसाठी एक कोटींचा निधी राखीव असेल. त्याचप्रमाणे चंद्रावर १०० दिवसांसाठी सहल घेऊन जाईन अशा शब्दही सर्वनानने आपल्या मतदारांना दिलाय.

mahayuti searching non controversial new face for nashik lok sabha seat
महायुतीतर्फे नव्या चेहऱ्याचा शोध; नाशिकमध्ये वाद टाळण्याचा प्रयत्न; जागा कोणत्या पक्षाला जाणार हे अस्पष्टच
Bharat Jodo Abhiyaan
भारत जोडो अभियानाची निवडणूकपूर्व राजकीय मशागत आघाडीच्या पथ्यावर!
india bloc, india bloc rally
जागावाटपावरून मतभेद, तरीही व्यासपीठावर एकत्र; ‘इंडिया’ आघाडीकडून एकजूट दाखवण्याचा प्रयत्न?
ठाण्यासाठी शिंदे गटाच्या जोर-बैठका; मतदारसंघात उमेदवारीसाठी कार्यकर्ते आग्रही ; भाजपाला जागा जाण्याच्या चर्चेने अस्वस्थता

प्रत्येक घरासाठी देण्यात येणाऱ्या वस्तूंबरोबरच सर्वनानने अनेक सर्वजनिक उपक्रम आणि मोठे प्रकल्प उभारण्याचंही आश्वासन दिलं आहे. यामध्ये अवकाश संशोधन केंद्र, रॉकेट लॉन्चिंग साईट, ३०० फूट उंचीचा कृत्रिम हिमकडा उभारणार असल्याचं सर्वनाने नमूद केलं आहे. मतदारसंघामध्ये उन्हाळ्याचा अनेकांना त्रास होत असल्याने हिमकडा उभारला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. याशिवाय जास्तीत जास्त तरुणांनी राजकारणामध्ये प्रवेश करावा यासाठी विशेष प्रयत्न आपण करु असंही सर्वनानने म्हटलं आहे. “आपल्यापैकी अनेकांना निवडणुकीमध्ये कसं सहभागी व्हायचं हे ठाऊक नसतं. मी ही पद्धत शिकून घेण्यासाठी निवडणूक लढवत आहे. लोकांना माहिती देण्यात आली तर राजकारणी घबरतील. असं झाल्यास चांगलं प्रशासन आणि राजकीय नेते आपल्याला मिळतील,” असं सर्वनान सांगतो.

“निवडणूक लढवण्यासाठी मी २० हजारांचे कर्ज काढलं आहे. त्यापैकी १० हजार रुपये मी अर्ज भरताना खर्च झालेत. दक्षिण मदुराईमध्ये दोन लाख ३० हजार मतदार आहेत. जर ५० तरुण निवडणुकीला उभे राहिले आणि प्रत्येकाने ५० मतं जरी मिळवली तरी कोणत्याच पक्षाला तामिळनाडूमध्ये विजय मिळवता येणार नाही. ते लोकांना घाबरतील. मी याचसंदर्भातील जागृती करण्यासाठी निवडणूक लढवत आहे,” असं सर्वनाने स्पष्ट केलं आहे.

अनेकांनी सर्वनानचा हा जाहीरनामा उहासात्मक पद्धतीने बनवण्यात आला असल्याचं ट्विटरवर म्हटलं आहे. वाटेल ती आश्वासनं देणाऱ्या मंत्र्यांना चिमटा काढण्यासाठी सर्वनानने हा जाहीरनामा प्रसिद्ध केल्याचं बोललं जात आहे. अनेकदा निवडणुका जिंकून झाल्यावर नेते त्यांची आश्वासन विसरतात म्हणूनच ते निवडणुकीत वाटेल ती आश्वासनं देतात हा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न सर्वनानने केल्याचं काहींना वाटत आहे.

१)

२)

३)

४)

या जाहीरनाम्यातील आश्वासनांसंदर्भात विचारण्यात आलं असता सर्वनानने, “मागील ५० वर्षांपासून राजकीय पक्ष लोकहिताच्या योजनांचं आश्वासनं देत निवडणुका जिंकत आहेत. त्यांनी सत्तेत आल्यानंतर कधीच लोकांची सेवा केली नाही. याचसंदर्भात जागृती करण्यासाठी मी हा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय जो यापूर्वी जगात कोणीच केला नव्हता,” असं सांगितलं.