लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीची रणधुमाळी चालू असून मतमोजणीची कल जरी भाजपच्या दिशेने दिसत असला, तरी गोव्याच्या पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचा मतदारसंघ असलेल्या पणजी येथे काँग्रेसने भाजपला धक्का दिला आहे. पणजीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे अटानेसियो माॅनसरेट यांचा १ हजार ७७४ मतांनी विजय मिळाला आहे.

अटानेसियो माॅनसरेट

पणजीची विधानसभा मतदारसंघातील जागा पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झाली होती. १९९४ सालापासून पर्रिकर हे जागी निवडून आले होते. पण त्यांच्या निधनानंतर या जागेसाठी काँग्रेसच्या अटानेसियो माॅनसरेट यांच्याविरुद्ध भाजपने सिद्धार्थ कुंकळीकर यांना उमेदवारी दिली होती. पण भाजपची जागा कायम राखण्यात कुंकळीकर यांना अपयश आले.

गोवा विधानसभेत एकूण ४० जागा आहेत. त्यापैकी १२ जागा भाजपकडे आहेत. पण महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पार्टीचे विजय सरदेसाई आणि ३ अपक्ष यांच्या सहकार्याने येथे भाजप सत्तेत आहे. तर काँग्रेसकडे १५ जागा आहेत.