16 October 2019

News Flash

५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं; अभिनेता रितेश देशमुखची मोदींवर टीका

आज आपण फेसबूक, ट्विटर वापरतो त्यासाठी लागणारा काॅम्प्युटर आणि मोबाईल ही काँग्रेसची देणगी आहे.

रितेश देशमुख

अभिनेते रितेश देशमुख याने काँग्रेसच्या एका व्यासपीठावर जाहीररित्या केंद्रातील भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. मोदींच्या ५६ इंच छाती या मुद्द्याची खिल्ली उडवताना ५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं, असं त्यांने म्हटलं आहे. रितेशच्या या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

रितेश म्हणाला, केंद्रातील भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नुसत्याच बढाया मारतात, प्रत्यक्षात ते ज्या गोष्टींचा खुबीने वापर करीत आहेत त्या सर्व काँग्रेसची देणगी आहे. आज आपण फेसबूक, ट्विटर वापरतो त्यासाठी लागणारा काॅम्प्युटर आणि मोबाईल ही काँग्रेसची देणगी असल्याचे आहे.

काँग्रेसने याआधी काहीही केलं नाही मात्र, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपणच सर्वकाही करतो आहोत, असे मोदींना वाटते. मात्र, भारताला स्वातंत्र मिळाले हे देखील काँग्रेसचीच देणगी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवावं, असे रितेशने म्हटले आहे.

मोदींच्या ५६ इंच छाती या मुद्द्यावरुनही टीका करताना रितेश म्हणाला, याबाबत मला प्रियंका गांधींचं वाक्य आठवतं ते म्हणतात, देश चालवायला ५६ इंच छाती नव्हे तर एक ह्रदय लागतं, चांगलं मन लागतं. मी पण विचार करीत होतो की ५६ इंच छाती म्हणजे केवढी मोठी छाती असते. ५६ इंचाच तर गोदरेजचं कपाट येतं, अशा शब्दांत रितेशने मोदींवर टीका केली.

First Published on April 16, 2019 8:54 am

Web Title: godrej cupboard waist comes 56 inch actor ritesh deshmukh criticizes modi