महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पुण्यात झालेल्या सभेमध्ये देशभरात माझी भाषणे पाहिली जातात याचा आनंद वाटतो असे मत व्यक्त केले होते. मागील आठवड्याभरापासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या राज यांचा बोलबाला केवळ प्रचारसभांमध्येच नाही तर गुगल ट्रेण्ड्समध्येही दिसून येत आहे. मागील सात दिवसांमध्ये गुगलवर ‘Raj Thackeray’ हे दोन शब्द चर्च करणाऱ्यांचे प्रमाण अनेक पटींनी वाढल्याचे गुगलच ट्रेण्डसमध्ये दिसत आहे. गुगलवर सर्च होण्याच्या बाबतीत राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही प्रचंड फरकाने मागे टाकले आहे. त्यामुळे नेटीझन्सचा ओढा पुन्हा एकदा अन्य नेत्यांच्या तुलनेत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नसलेल्या राज ठाकरेंच्याकडे असल्याचे दिसून येत आहे.

पाडव्यापासून नेटकऱ्यांमध्ये राज यांचीच क्रेझ

 

कोणत्या राज्यातून कोणाबद्दल होतेय सर्च (पाडव्यापासूनचा ट्रेण्ड)

१२ एप्रिलपासून नांदेड येथील सभेपासून राज ठाकरेंनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. याच तारखेपासून गुगलवर राज ठाकरे सर्च करणाऱ्या भारतीयांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. ६ एप्रिल रोजी झालेल्या पाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरेंनी आपण मोदी आणि शाह यांच्याविरोधात राज्यभरात सभा घेणार असल्याचे जाहीर केले. या दिवशी राज ठाकरे यांच्याबद्दल सर्वाधिक सर्च झाल्याचे गुगल ट्रेण्डमध्ये दिसत आहे. त्यानंतर सहा दिवसांनी म्हणजेच १२ एप्रिलपासून राज यांच्या दौऱ्याची सुरुवात झाल्यानंतर राज यांच्या नावाने गुगल सर्च करणाऱ्यांचे प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे. सभेच्या दिवशी राज यांच्याबद्दल गुगल सर्च करण्याचा ट्रेण्डच मागील सात दिवसांपासून दिसत आहे.

मागील सात दिवसांमधील चार नेत्यांच्या नावांसंदर्भातील सर्चचे निकाल

 

दक्षिणेत राज यांचाच राज तर उत्तरेत पवारांची पॉवर (मागील सात दिवसांचा डेटा)


मागील तीस दिवसांमधील राज यांच्यासंदर्भातील ट्रेण्ड

मागील तीस दिवसांमधील राज ठाकरे शब्द सर्च होण्याचा ट्रेण्ड

 

मागील सात दिवसांमधील राज ठाकरे शब्द सर्च होण्याचा ट्रेण्ड


सर्वाधिक सर्च कुठून होते-

राज ठाकरे यांच्याबद्दल सर्वाधिक सर्च हे महाराष्ट्रातून केले जाते. त्या खालोखाल गोवा, छत्तीसगड, कर्नाटक, झारखंड या राज्यांच्या क्रमांक सर्वाधिक वेळा राज ठाकरे सर्च करणाऱ्या राज्यांच्या यादीत लागतो. विशेष म्हणजे यापैकी बहुतांश राज्य ही भाजपाची सत्ता असणारी राज्ये आहेत.

 

मागील तीस दिवसांमध्ये या राज्यांच्यामधून झाले सर्वाधिक सर्च

 

मागील सात दिवसांमध्ये या राज्यांतून झाले सर्वाधिक सर्च


आणखीन काय सर्च होते – 

राज ठाकरे यांच्या सभा ज्या ज्या ठिकाणी होत आहेत त्या शहरांच्या नावांने गुगल सर्च करण्याचे प्रमाणही वाढल्याचे दिसत आहे. उदाहणार्थ नांदेड, सोलापूर, शिवाजी पार्क, इचलकरंजी या शहरांची नावे राज यांच्यासंदर्भात सर्च करताना सर्च करण्यात आल्याचे गुगल ट्रेण्डसमध्ये दिसून येते.

महिन्याभरात राज यांच्यासंदर्भात सर्च झालेले विषय


‘लाव रे तो व्हिडिओ’ही होतेय सर्च-

राज ठाकरे यांच्या या दौऱ्यातील सर्वाधिक गाजलेले वाक्य म्हणजे ‘लाव रे तो व्हिडिओ’. राज ठाकरे यांच्यासंदर्भात सर्च करताना हे वाक्य सर्च करणाऱ्यांचे प्रमाणही वाढल्याचे गुगल ट्रेण्ड्समध्ये दिसत आहे. रिलेटेड क्वेरी म्हणजेच राज ठाकरेंच्या नावाबरोबर सर्वाधिक सर्च होणारे शब्दांमध्ये ‘लाव रे तो व्हिडिओ’ पहिल्या क्रमांकावर आहेत.

‘लाव रे तो व्हिडिओ’ पहिल्या क्रमांकावर

दरम्यान राज यांच्या दौऱ्यातील आज शेवटची सभा रायगड येथे होणार आहे.